येवल्यात भुजबळांनी उडवली पतंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2022 17:11 IST2022-01-15T17:09:53+5:302022-01-15T17:11:36+5:30
कोरोनाबाबत अधिक काळजी घेण्याचे आवाहन

येवल्यात भुजबळांनी उडवली पतंग
ठळक मुद्देदरवर्षी भुजबळ हे पतंग उत्सवात आवर्जून सहभागी होत असतात
येवला : मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर येवला शहरात सध्या पंतग उत्सव साजरा केला जात आहे. यंदा या उत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत शनिवारी (दि.१५) जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पतंग उडवण्याचा आनंद लुटला. यावेळी उत्सव साजरा करत असतांना नागरिकांनी कोरोनाबाबत अधिक काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. दरवर्षी भुजबळ हे पतंग उत्सवात आवर्जून सहभागी होत असतात. याप्रसंगी संजय बनकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, मोहन शेलार,वसंत पवार, ज्ञानेश्वर शेवाळे, सचिन कळमकर आदी उपस्थित होते.