शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भीमराया, घे तुझ्या लेकरांची वंदना...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 00:51 IST

शहरातील विविध सामाजिक संस्था व संघटनांच्या वतीने डॉ़ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली़ यावेळी डॉ़ आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले़

नाशिक : शहरातील विविध सामाजिक संस्था व संघटनांच्या वतीने डॉ़ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली़ यावेळी डॉ़ आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले़ तसेच शाळा, महाविद्यालयांतही तसेचनाशिकरोड, पंचवटी, इंदिरानगर, सिडको, सातपूर परिसरातील शाळा,महाविद्यालय, संस्था, शासकीय कार्यालय आदी ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविधकार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते़एक गाव  एक भीमजयंतीसिडको : परिसरात डॉ़ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते़ अंबड ग्रामस्थांनी एक गाव एक भीमजयंती उत्सवाची परंपरा यंदाही राखली असून, यावेळी भीमजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.सर्व पक्षांचे पदाधिकारी आपले पक्षभेद, मतभेद बाजूला ठेवून एक गाव एक भीमजयंती साजरी करण्यासाठी सहभागी झाले होते. यानिमित्त शाहीर सीमा पाटील व जॉली मोरे यांचा शिव, शाहू, फुले, आंबेडकरी शाहिरी जलसा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गावातील मनपा शाळेसमोरील जागेवरील सुशोभित व्यासपीठावर डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास ग्रामस्थ व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच सायंकाळी पाथर्डी फाटा ते अंबडगाव मिरवणूक काढण्यात आली. नगरसेवक राकेश दोंदे, दिलीप दातीर, भागवत आरोटे, आमदार सीमा हिरे, शिवाजी चुंबळे, साहेबराव दातीर, महेश दातीर, सचिन मांडे, खंडू दातीर, पांडू दोंदे, बाजीराव दातीर, रवींद्र दोंदे, राजेंद्र दोंदे, बाळकृष्ण दोंदे, विष्णू फडोळ, योगेश शिंदे आदी सहभागी झाले होते.पवननगर येथे अभिवादनपवननगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्र माचे आयोजन संतोष सोनपसारे यांनी केले होते. यावेळी आनंद सोनवणे, जयंत जाधव, डॉ़ अपूर्व हिरे, मुकेश शहाणे यांनीही भेट देऊन पुतळा पूजन केले. यावेळी प्रवीण देवरे, धनंजय भावसार, अजय घुले, राजू शहा, शशिकांत गोसावी, राजू वराडे, अतुल भामरे, बबलू सोनवणे, विशाल पगारे, रतन ढेपे, बाळा दराडे, धनाजी लगड, गणेश अरिंगळे यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.उत्तमनगर येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. समितीचे संयोजक सुनील जगताप यांनी कार्यक्र माचे आयोजन केले होते. यावेळी माजी आमदार अपूर्व हिरे, नगरसेवक मुकेश शहाणे, नीलेश ठाकरे, शीतल भामरे, संजय भामरे, संतोष सोनपसारे, मुरली भामरे, अनिल आठवले, शबाना पठाण, मनोहर काळे, डॉ. संदीप मंडलेचा, दीपक मटाले, संदीप वाघ, पिंटू साळुंखे, मदन जमदाडे, अंकुश वºहाडे, पप्पू पाटील, मुन्ना मगर, सागर मोरे, दिनेश बोरसे आदी प्रयत्नशील होते.

टॅग्स :dr. babasaheb ambedkar birthday celebrationडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीNashikनाशिक