मावळते अध्यक्ष शिवाजीराव कारवाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. मावळते सचिव पंडित कुमावत यांनी कुमावत उन्नती मंडळाच्या प्रगतीचा आढावा प्रस्तावनेतून मांडला. सर्वानुमते कुमावत उन्नती मंडळाच्या अध्यक्षपदी अशोक भवरे, उपाध्यक्षपदी अतुल चव्हाण, सचिव कैलास परदेशी, सहसचिवपदी कैलास सारडीवाळ, संघटकपदी अर्जुन अनावडे, रामचंद्र अनावडे यांची निवड करण्यात आली. यावेळी मावळते अध्यक्ष शिवाजीराव कारवाळ, मोहनराव शेलार, प्रफुल्लचंद्र कुमावत, सुभाषराव मोरे देविदास परदेशी, अशोक कुमावत यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. याप्रसंगी भगवानराव अनावडे, हिरामण परदेशी, रामभाऊ खरोले, झोन अध्यक्ष भाऊसाहेब परदेशी, भाऊसाहेब चव्हाण, राजेंद्र शेलार, सिद्धार्थ पन्हेर, सुंदरलाल बगीनवाल, सचिन कुमावत, मच्छिंद्र कामे, बाजीराव कुमावत, अशोक मुंडावरे, आप्पासाहेब कुमावत, युवा शहराध्यक्ष अमोल कुमावत, जिल्हा युवा जिल्हाध्यक्ष विशाल कुमावत, राकेश कारवाळ, अभिजीत पाडवे, पुणे महिला जिल्हाध्यक्ष वंदना कुमावत उपस्थित होते.
कुमावत उन्नती मंडळाच्या अध्यक्षपदी भवरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 00:11 IST