मुखेड सोसायटीवर भवानी माता पॅनल
By Admin | Updated: October 13, 2016 23:26 IST2016-10-13T23:15:50+5:302016-10-13T23:26:50+5:30
मुखेड सोसायटीवर भवानी माता पॅनल

मुखेड सोसायटीवर भवानी माता पॅनल
येवला : तालुक्यातील मुखेड येथील भाग्यलक्ष्मी विविध कार्यकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत भवानी माता पॅनलने संपूर्ण जागावर विजय मिळविला.
सोसायटीची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत भवानी माता पॅनलच्या ४ जागा बिनविरोध निवडल्या गेल्या. त्यामुळे९ जागेसाठी निवडणूक घेण्यात आली.
या निवडणुकीत इतर मागास प्रवर्गातून संतोष देवराम आहेर , सर्वसाधारण जागेवर अरु ण नामदेव आहेर , छगन लहानू आहेर , रघुनाथ विश्वनाथ पानसरे , विजय श्रीधर जाधव , धनंजय शंकर राउतराय , सुदाम दामोदर देवरे, भाऊसाहेब बाबुराव ठोक, प्रशांत भागवत आहेर मते मिळवून विजयी झाले आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर.एम लोंढे यांनी
काम पाहिले. त्यांना संस्थेचे सचिव विजय भगत यांनी सहकार्य केले. विजयी उमेदवाराचे पनल चे नेते अरु ण आहेर, छगनराव आहेर, रत्नाकर आहेर, विजय आहेर यांनी सत्कार केला.