घोटी : इगतपुरी तालुक्यातील औद्योगिक वसाहत आणि मोठा कारभार असणाऱ्या गोंदे दुमाला ग्रामपंचायतीतील जलशुद्धीकरण प्रकल्प राज्यात उत्कृष्ट आहे. या प्रकल्पात योगदान देणारे गोंदे दुमालाचे जलसुरक्षारक्षक भाऊसाहेब कातोरे यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा प्रकल्प पाहण्यासाठी शासनाकडून नेहमीच अभ्यासक येत असतात. कातोरे यांनी केलेल्या कामगिरीमुळेच सन्मान वाढला असल्याचे गौरवोद्गार इगतपुरीचे गटविकास अधिकारी किरण जाधव यांनी काढले. पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, जिल्हा परिषद नाशिक, पंचायत समिती इगतपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने इगतपुरी येथे तालुकास्तरीय स्वच्छता महोत्सव आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी जाधव यांच्या हस्ते कातोरे यांना पुरस्कार देण्यात आला. महोत्सवास सभापती कल्पना हिंदोळे, उपसभापती भगवान आडोळे, सहायक गटविकास अधिकारी भरत वेंदे, गटनेते विठ्ठल लंगडे, पंचायत समिती सदस्य जया कचरे, सोमनाथ जोशी, अण्णा पवार, जिजाबाई नाठे, विमलबाई गाढवे, कौसाबाई करवंदे, विमलबाई तोकडे आदी उपस्थित होते.
भाऊसाहेब कातोरे यांना जलसुरक्षेचा विशेष पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 00:25 IST