उद्या माघारीला होणार ‘भाऊगर्दी’

By Admin | Updated: February 12, 2017 00:52 IST2017-02-12T00:51:56+5:302017-02-12T00:52:25+5:30

उद्या माघारीला होणार ‘भाऊगर्दी’

'Bhaugardi' to be canceled tomorrow | उद्या माघारीला होणार ‘भाऊगर्दी’

उद्या माघारीला होणार ‘भाऊगर्दी’

नाशिक : जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी सोमवारी (दि.१३) माघारी १३ फेब्रुवारीला माघारीची मुदत असून, माघारीसाठी एकच दिवस असल्याने बंडखोर व अपक्षांची माघार घेता घेता, राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची धावपळ उडणार असल्याचे चित्र आहे.
उमेदवारी माघारीसाठी एकच दिवस ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसारच हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
नाशिक महापालिकेसाठी मात्र उमेदवारी अर्ज माघारीची मुदत ४ ते ७ फेब्रुवारी दरम्यान होती. चार दिवस उमेदवारांनी माघार घेतली. मात्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या अर्ज माघारीची मुदत जरी ८ ते १३ फेब्रुवारी असली तरी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी एकच दिवस १३ फेब्रुवारीला देण्यात आला आहे. १३ फेब्रुवारीला सर्वच तालुका पातळीवरील कार्यालयात एका दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेण्यात येणार असून, एकाच दिवशी माघार असल्याने सर्वच ठिकाणी प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज एकाच दिवशी मागे घेण्यात येणार असल्याने राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांना अपक्षांच्या तसेच बंडखोरांच्या माघारीसाठी चांगलीच धावपळ करावी लागण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: 'Bhaugardi' to be canceled tomorrow