भारतीय जनता पक्षाचा पेठ येथे कार्यकर्ता मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 00:20 IST2020-10-18T22:05:17+5:302020-10-19T00:20:54+5:30
पेठ : आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेठ येथे भारतीय जनता पक्षाचा तालुका मेळावा संपन्न झाला.

भारतीय जनता पक्षाचा पेठ येथे कार्यकर्ता मेळावा
पेठ : आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेठ येथे भारतीय जनता पक्षाचा तालुका मेळावा संपन्न झाला.
जिल्हा संघटनमंत्री सुनील बच्छाव यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या मेळाव्यात डिसेंबरअखेर नगरपंचायत निवडणुकाच्या हालचाली सुरू होणार असून, प्रभागनिहाय चाचपणी करून योग्य नियोजन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तालुका कार्यकारिणी व शहर कार्यकारिणीने मतदार व सामान्य जनतेपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष सचिन दराडे, तालुकाध्यक्ष संजय वाघ, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विजय देशमुख, छगन चारोस्कर, विजय धूम, संकेत नेवकर, जीवन जाधव, रमेश गालट , त्र्यंबक कामडी, प्रमोद शार्दुल, राजेंद्र गवळी, छबीलदास चौधरी, रघुनाथ चौधरी, रामदास भोये, लताबाई गायकवाड, आनंदा पवार. हेमराज धुम आदि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
(फोटो १८ पेठ २)
पेठ येथे भाजप मेळाव्याप्रसंगी उपस्थित सुनील बच्छाव, सचिन दराडे, संजय वाघ, त्र्यंबक कामडी , विजय देशमुख आदी.