शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

गोदापात्रावर भरारी पथकांची नजर

By admin | Updated: April 4, 2017 02:23 IST

नाशिक : गोदावरी नदीपात्रातील प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने स्थापन केलेल्या गोदावरी कक्षामार्फत आता मंगळवार (दि.४) पासून घाण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे

 नाशिक : गोदावरी नदीपात्रातील प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने स्थापन केलेल्या गोदावरी कक्षामार्फत नागरिकांचे प्रबोधन झाल्यानंतर आता मंगळवार (दि.४) पासून घाण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, गोदावरी संवर्धनासाठी दोन भरारी पथके नियुक्त करण्यात आली असून, त्यांची नजर असणार आहे. महापालिकेने गोदावरी नदीपात्रात घाण-कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिल्यांदा गुन्हा करताना सापडल्यास १ हजार रुपये तर पुन्हा तोच गुन्हा करताना दुसऱ्यांदा आढळून आल्यास ५ हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने काटेकोर अंमलबजावणीकरिता गोदावरी कक्षाची स्थापना करत त्यासाठी स्वतंत्र उपआयुक्ताची नियुक्ती केली आहे. त्यानुसार, गेल्या तीन दिवसांपासून रामकुंड व घाट परिसरात महापालिकेच्या सुरक्षा रक्षक, कर्मचाऱ्यांमार्फत नागरिकांना गोदापात्रात कपडे धुणे, घाण-कचरा टाकणे यापासून परावृत्त केले जात आहे. प्रबोधनानंतर आता मंगळवार, दि. ४ एप्रिलपासून प्रत्यक्ष दंडात्मक कारवाईला सुरुवात केली जाणार आहे. त्यासाठी सद्यस्थितीत ४० सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. त्यातील २० सुरक्षा रक्षक सकाळच्या सत्रात तर उर्वरित प्रत्येकी १० सुरक्षा रक्षक दुपार आणि सायंकाळच्या सत्रात नियुक्त केले जाणार आहेत. गोदापात्रावर नजर ठेवण्यासाठी आनंदवली ते थेट दसक-पंचकपर्यंत दोन भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत.