सटाणा : शहरालगत असलेल्या भाक्षी ग्रामस्थांना पाणीपुरवठा करणारी विहिर तुडूंब भरून असतांना देखील ऐन पावसाळ्यात गत दहा दिवसांपासुन भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असतांनाच परिसरातील विजेचे दिवे बंद, तसेच करोना आजाराच्या पार्श्वभुमीवर आरोग्याची एैशी तैशी झाल्याने ग्रामस्थांनी ग्रामसेवकांना कार्यालयात डांबुन ठेवत बागलाणचे गटविकास अधिकारी कोल्हे यांना घेराव घालूून आक्रमक होवुन सामाजिक अंतराला हरताळ फ ासत तीव्र आंदोलन केले. सटाणा शहराला लागुन असलेल्या भाक्षी ग्रामपंचायत हद्दीतील रामनगर, शरद नगर, फ ुले नगर, आदी परिसरात ऐन पावसाळ्यात गत दहा दिवसांपासुन ग्रामपंचायतीचा पाणी पुरवठा बंद आहे. ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा विहिर भरलेली असतांना देखील ही पाणीपुरवठा बंद असल्याने नागरीकांना उन्हाळ्याप्रमाणेच पाण्यासाठी भटकंती करावी लागत असुन रस्ता ओलांडून सटाणा नगर परिषदेच्या हद्दीतील नागरींकाकडून पाणी भरावे लागत आहे. तसेच या नववसाहतीमधील स्ट्रीट लाईट गेल्या अनेक दिवसांपासुन बंद आहेत. वारंवार तक्रार करून सुधारणा होत नाही, तसे नववसाहत परिसरा पावसाच्या पाण्यामुळे डबके साचून आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच गटारी नसल्याने सांडपाणी रस्त्यावरून थेट घरात घुसू लागल्याने संतप्त झालेल्या रहिवाशांनी आज ग्रामसचिव पंकज पवार यांना दालनात कोंडले. यावेळी नजीकच असलेल्या पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पी. एस कोल्हे आंदोलनस्थळी आल्यावर त्यांनाच घेराव घालुन निवेदन सादर केले. या प्रसंगी सरपंच पुनम सुयर्वंशी, उपसरपंच सौरभ सोनवणे, भास्कर पाटील, योगेश सुयर्वंशी, संदीप बागुल, मनोज पिंगळे, दीपक महिरे, नाना वनीस, दिलीप उशीरे, योगेश पवार, अरूण देवरे, प्रशांत खरे, निलेश खैरणार, अश्विनी बागुल, निमर्ला गायकवाड आदीं आंदोलनात सहभागी होते. (१९ सटाणा १)
भाक्षी ग्रामस्थांनी ग्रामसेवकाला डांबले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 14:57 IST
सटाणा : शहरालगत असलेल्या भाक्षी ग्रामस्थांना पाणीपुरवठा करणारी विहिर तुडूंब भरून असतांना देखील ऐन पावसाळ्यात गत दहा दिवसांपासुन भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असतांनाच परिसरातील विजेचे दिवे बंद, तसेच करोना आजाराच्या पार्श्वभुमीवर आरोग्याची एैशी तैशी झाल्याने ग्रामस्थांनी ग्रामसेवकांना कार्यालयात डांबुन ठेवत बागलाणचे गटविकास अधिकारी कोल्हे यांना घेराव घालूून आक्रमक होवुन सामाजिक अंतराला हरताळ फ ासत तीव्र आंदोलन केले.
भाक्षी ग्रामस्थांनी ग्रामसेवकाला डांबले
ठळक मुद्देपाणीटंचाईचा प्रश्न : गटविकास अधिकाऱ्याला घेराव, नववसाहत समस्यांच्या विळख्यात