रस्त्यावरील भाजीबाजार, पंचवटीकर बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 12:29 AM2018-11-13T00:29:42+5:302018-11-13T00:30:11+5:30

भाजीबाजार म्हटले तर नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत अत्यावश्यक बाब आहे. परंतु कुठेही आणि कसेही सुरू होणारे भाजीबाजार मात्र वाहतुकीच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत आहे. पंचवटी परिसरातील विशेषत: महामार्ग तसेच वाहनांची वर्दळ असलेल्या मुख्य वाहतुकीच्या रस्त्यावरच दैनंदिन तसेच आठवडे भाजीबाजार भरत असल्याने आठवडे भाजीबाजाराच्या दिवशी तर वाहतुकीसह पादचारी मार्गाला बे्रक लागत आहे.

Bhajibazar, Panchavikar Bazar on the road | रस्त्यावरील भाजीबाजार, पंचवटीकर बेजार

रस्त्यावरील भाजीबाजार, पंचवटीकर बेजार

Next

पंचवटी : भाजीबाजार म्हटले तर नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत अत्यावश्यक बाब आहे. परंतु कुठेही आणि कसेही सुरू होणारे भाजीबाजार मात्र वाहतुकीच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत आहे. पंचवटी परिसरातील विशेषत: महामार्ग तसेच वाहनांची वर्दळ असलेल्या मुख्य वाहतुकीच्या रस्त्यावरच दैनंदिन तसेच आठवडे भाजीबाजार भरत असल्याने आठवडे भाजीबाजाराच्या दिवशी तर वाहतुकीसह पादचारी मार्गाला बे्रक लागत आहे. रस्त्यावर भरणाऱ्या दैनंदिन तसेच आठवडे भाजीबाजारामुळे भाजीपाला विक्रेते तसेच शेकडो ग्राहकांचा जीव धोक्यात येत असला तरी याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने रस्त्यावरचे भाजीबाजार अपघाताला निमंत्रण ठरताहेत.  विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांत महापालिकेने वाजतगाजत हॉकर्स झोन तयार केले आहेत. मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी तर दूरच उलट रिक्त झालेल्या जागांवर नवीन अतिक्रमणे होत असल्याने नागरिक बेजार झाले आहेत.
पंचवटी विभागातील महामार्गालगत असलेल्या हिरावाडी, कमलनगर चौफुली, हनुमाननगर, तारवालानगर ते अमृतधाम चौफुली रस्त्यावर दर सोमवारी आठवडे बाजार भरतो. यातील हनुमाननगर येथील भाजीबाजार काही महिन्यांपूर्वीच निलगिरी बाग परिसरात स्थलांतरित करण्यात आलेला आहे. तर दर शनिवारी अमृतधाम चौफुलीवर भरणारा आठवडे भाजाीबाजार सध्या अयोध्यानगरी परिसरातील नागरी वसाहतीत असलेल्या रस्त्यावर भरत आहे. हिरावाडीतील (कमलनगर) परिसरात दर सोमवारी भरणाºया आठवडे बाजाराची व्याप्ती तर दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. रिंगरोडवर बसलेला भाजीबाजार आता एसएसडीनगर रस्ता, अभिजितनगरपर्यंत पसरलेला आहे. सोमवारच्या दिवशी तर वाहने सोडाच परंतू नागरिकांनादेखील पायी चालण्यासाठी कसरत करावी लागते. या आठवडे बाजारामुळे क्रीडा संकुलकडून येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प पडत असल्याचे चित्र दिसून येते. या भाजीबाजारात भरेकरी विशेषत: शेतकरी वर्गाची संख्या मोठी असल्याने त्यांना आठवडे बाजारासाठी प्रशासनाने तात्पुरती का होईना जागा करून देणे गरजेचे आहे, मात्र प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने सध्या तरी शेकडो विक्रेत्यांना व भाजीपाला खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना जीव धोक्यात घालूनच भाजीबाजारात यावे लागत आहे.
अशीच परिस्थिती दिंडोरीरोड तसेच पेठरोडवर भरणाºया दैनंदिन भाजीबाजाराची आहे. सायंकाळच्या सुमाराला तर या रस्त्याने वाहने नेताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. अनेकदा या रस्त्यावर किरकोळ अपघात घडतात. भाजीबाजार नागरिकांसह प्रशासनाची डोकेदुखी ठरत असली तरी या भाजीबाजाराबाबत प्रशासनाकडून कोणताही तोडगा काढला जात नाही. पेठरोडवर तर सायंकाळच्या सुमाराला दैनंदिन रस्त्याच्या दुतर्फा भाजीबाजार भरतो.
या भाजीबाजाराची व्याप्ती इतकी वाढलेली आहे की भाजीपाला खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना रस्त्यातच वाहने उभी करावी लागतात. झोपडपट्टीचा परिसर असल्याने अनेकदा या रस्त्यावर लहान मुले खेळतात त्यातच वाहनांची ये-जा त्यामुळे अनेकदा वाहनांचा धक्का लागून किरकोळ अपघात होऊन त्यातून शाब्दिक वादावादी सुरू असल्याचे दिसून येते.
या भाजीबाजारांमुळे नागरिक त्रस्त
झाले आहेत. नवीन जागेची निश्चिती आणि बाजारांचे स्थलांतर कधी होणार असा प्रश्न केला जात आहे.
दिंडोरीरोडवर सायंकाळच्या सुमारास निमाणी बसस्थानकाकडे येणाºया रस्त्यावर भाजीबाजार सुरू होतो. याच ठिकाणी प्रवासी काळ्या टॅक्सी उभ्या असतात तर निमाणी बसस्थाकाजवळच्या पादचारी मार्गावर नागरिक कमी आणि हातगाड्या अधिक असे चित्र दिसते. त्यामुळे रस्त्याने पायी जाणाºया पादचाºयांना जागा नसल्याने त्यांना पायी जाताना जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागते.
पंचवटीच्या अन्य अनेक भागात अशाप्रकारे रस्त्यावर भाजीबाजार वाढत आहे. नागरिकांची ती गरज असली तरी महापालिकेच्या वतीने कोणत्याही प्रकारचे नियोजन केले जात नाही. काही वर्षांपूर्वी महापालिकेच्या वतीने सोसायटी परिसरातील खुल्या जागांमध्ये पाच टक्के जागा भाजी विक्रेत्यांसाठी सोडण्याबाबत बंधनकारक करण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र त्यावर पुढे कार्यवाही झालेली नाही.
एकीकडे रस्त्यावर भाजीबाजार भरत असताना दुसरीकडे गंगाघाटावरील भाजीपाला विक्रेत्यांसाठी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करू न आयुर्वेद महाविद्यालयासमोर भाजीमंडई उभारली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भाजीमंडईत विक्रेते येतच नसल्याने सध्या बेघर तसेच भिकाºयांनी या मंडईचा ताबा घेतलेला आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या भाजीमंडईची पाहणी करून भाजी विक्रेत्यांना भाजीमंडईत स्थलांतराचे आदेश दिले होते. त्यानुसार मनपाने भाजीमंडईची साफसफाई केली होती, मात्र त्यानंतर कोणतीही कृती झालेली नाही. भाजीमंडईची इमारत सध्या धूळ खात पडून असल्याने तूर्तास पालिकेने केलेल्या भाजीमंडईचा खर्च वाया गेल्याचे दिसत आहे.

Web Title: Bhajibazar, Panchavikar Bazar on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.