ब्राह्मणगाव सोसायटी चेअरमनपदी मोठाभाऊ अहिरे
By Admin | Updated: June 1, 2017 01:07 IST2017-06-01T01:07:04+5:302017-06-01T01:07:16+5:30
ब्राम्हणगाव : येथील ब्राह्मणगाव बृहत विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी मोठाभाऊ वनाजी अहिरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली

ब्राह्मणगाव सोसायटी चेअरमनपदी मोठाभाऊ अहिरे
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राम्हणगाव : येथील ब्राह्मणगाव बृहत विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी मोठाभाऊ वनाजी अहिरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेच्या कार्यालयात झालेल्या सभेत अध्यक्षस्थानी माजी चेअरमन अरुण अहिरे होते.
याप्रसंगी तंटामुक्तीचे अध्यक्ष ज्ञानदेव अहिरे, ज्येष्ठ नेते राघोनाना अहिरे यांनी मार्गदर्शन केले. उपस्थित सर्व सदस्यांनी मोठाभाऊ अहिरे यांचे नाव सुचविले, त्यास सदस्य चंद्रकांत अहिरे यांनी उपस्थितांतर्फेअनुमोदन दिले. त्यानंतर नवोदित चेअरमन मोठाभाऊ अहिरे, माजी चेअरमन अरुण अहिरे, व्हाईस चेअरमन बारकू झाडे यांचा सत्कार जि.प.चे माजी सदस्य पप्पू बच्छाव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सभेत सदस्य नरेंद्र अहिरे, दीपक सूर्यवंशी, चंद्रकांत अहिरे, सुनील शेवाळे, सुनील विसपुते, हेमंत अहिरे, दिलीप अहिरे, सुभाष अहिरे, माजी सरपंच सुभाष अहिरे, ज्येष्ठ नेते हेमंत अहिरे, कैलास अहिरे, विश्वास अहिरे व सभासद हजर होते.