भगूर नगरपालिकेच्या विषय समिती निवड बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:36 IST2018-01-25T00:36:16+5:302018-01-25T00:36:50+5:30
येथील नगरपालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती आणि सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नगरपालिका सभागृहात बुधवारी सकाळी ११ वाजता तहसीलदार जयश्री आहिरराव यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवकांची बैठक घेण्यात आली.

भगूर नगरपालिकेच्या विषय समिती निवड बिनविरोध
भगूर : येथील नगरपालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती आणि सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नगरपालिका सभागृहात बुधवारी सकाळी ११ वाजता तहसीलदार जयश्री आहिरराव यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. सार्वजनिक बांधकाम सभापती- उत्तम आहेर, सदस्य - विजय करंजकर, संजय शिंदे, अश्विनी साळवे, जयश्री देशमुख, शिक्षण समिती सभापती- मनीषा कस्तुरे, सदस्य- प्रतिभा घुमरे, स्वाती झुटे, सुदेश वालझाडे, पंकज कलंत्री, आरोग्य समिती सभापती- संगीता पिंपळे, सदस्य- मोहन करंजकर, दीपक बलकवडे, फरीद बाबू शेख, शकुंतला कुंडारिया, पाणीपुरवठा सभापती- आर. डी. साळवे, सदस्य- दीपक बलकवडे, भाऊसाहेब गायकवाड, सुदेश वालझाडे, विजय करंजकर, महिला व बाल कल्याण सभापती- अनिता ढगे, सदस्य- जयश्री देशमुख, स्वाती झुटे, अश्विनी साळवे, पंकज कलंत्री यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी नगराध्यक्ष अनिता करंजकर, उपनगराध्यक्ष मनीषा कस्तुरे, मुख्य अधिकारी संगीता नांदरकर, अधीक्षक रमेश राठोड उपस्थित होते.