भगूर ते नाशिकरोड रिक्षाभाडे महागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 01:11 IST2019-06-25T01:11:05+5:302019-06-25T01:11:36+5:30

रिक्षामध्ये तीनच प्रवासी बसविण्याच्या निर्णयामुळे रिक्षाचालकांनी प्रवासी भाड्यात वाढ केली असून, त्यानुसार भगूर ते नाशिकरोड रिक्षाचे प्रवासी भाडे आता तीस रुपये इतके झाले आहे.

 Bhagur and Nashik Road Rikshabhade expensive | भगूर ते नाशिकरोड रिक्षाभाडे महागले

भगूर ते नाशिकरोड रिक्षाभाडे महागले

भगूर : रिक्षामध्ये तीनच प्रवासी बसविण्याच्या निर्णयामुळे रिक्षाचालकांनी प्रवासी भाड्यात वाढ केली असून, त्यानुसार भगूर ते नाशिकरोड रिक्षाचे प्रवासी भाडे आता तीस रुपये इतके झाले आहे. या भाडेवाढीमुळे प्रवासी वर्गात नाराजी असताना चालकांनी मात्र पोलिसांच्या नियमावर खापर फोडले आहे. भाडेवाढ प्रवाशांना परवडत नसल्याचे काही रिक्षाचालकांचे म्हणणे असले तरी त्याशिवाय पर्याय नसल्याचेही म्हटले आहे.
भगूर बसस्थानक ते नाशिकरोड बिटको प्रवासादरम्यान रिक्षाचालकांनी सध्याच्या वीस रुपये भाडे दरात दहा रु पये वाढ केली आहे. त्याप्रमाणेच भगूर देवळाली कॅम्पपर्यंत पाच रुपयांची भाडेवाढ केल्याने प्रवासी वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भगूर ते बिटको वीस रुपये इतकेच भाडे होते. त्यामुळे प्रतिसाद चांगला होता.
त्याबरोबरच भगूर ते देवळाली कॅम्प दहा रुपये प्रतिसीट याप्रमाणे असे रिक्षाभाडे होते. आता तेथेही वाढ करण्यात आलेली आहे. गेल्या ८ जून रोजी पोलिसांनी रिक्षाचालकांची बैठक घेऊन रिक्षात फक्त तीनच प्रवासी घेऊन वाहतूक करण्याचा सक्त आदेश दिल्याने रिक्षाचालकांना व्यवसाय करणे कठीण झाले आहे. त्यामुळे रिक्षाचालकांनी ८ जूनपासून भगूर ते देवळाली कॅम्प १५ रुपये, भगूर ते बिटको ३० रुपये, भगूर ते देवळाली रेल्वेस्टेशन २० रुपये रिक्षाभाडे घेण्यास सुरु वात केली आहे. त्यामुळे प्रवाशांत नाराजी व्यक्त होत आहे.
मुदतबाह्य रिक्षा धावतायेत ग्रामीण रस्त्यांवर
ज्या रिक्षांची मुदत संपली व आरटीओ पासिंग नाही अशा रिक्षा भगूर-नाशिकरोड मार्गावर बंद ठेवण्यात आल्या आहेत. काहींनी अशा रिक्षा घरीच ठेवल्या आहेत. भगूर-नानेगाव-राहुरी-दोनवाडे ते विंचुरी दरम्यान ग्रामीण भागात कमी भाडे आकारत व्यवसाय करू लागले आहेत.

Web Title:  Bhagur and Nashik Road Rikshabhade expensive