पोलिसांकडून मानाची चादर : सर्वधर्मीयांचे श्रध्दास्थान नाशिकमधील बडी दर्गा आजपासून गजबजणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 02:32 PM2018-04-18T14:32:38+5:302018-04-18T14:32:38+5:30

जुने नाशिक गावठाण भागातील ही एकमेव पारंपरिक मोठी यात्रा मानली जाते. या यात्रेचा सर्वधर्मीय नागरिक मोठ्या संख्येने आनंद लुटतात. जुने नाशिक परिसर हिंदू-मुस्लीमबुहल परिसर म्हणून ओळखला जातो.

Bhadrakali from Police: all religion devotee of Nashik: Big Darga in old Nashik | पोलिसांकडून मानाची चादर : सर्वधर्मीयांचे श्रध्दास्थान नाशिकमधील बडी दर्गा आजपासून गजबजणार

पोलिसांकडून मानाची चादर : सर्वधर्मीयांचे श्रध्दास्थान नाशिकमधील बडी दर्गा आजपासून गजबजणार

googlenewsNext
ठळक मुद्देमहिला भाविकांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वारयंदाचा ३८९वा उरूस जातीय सलोख्याचे प्रतीक म्हणून बडी दर्गाचा नावलौकिक

नाशिक : जुने नाशिकमधील सर्व धर्मीयांचे श्रध्दास्थान असलेले हजरत पीर सय्यद सादिकशाह हुसेनी बाबा यांचा बडी दर्गा आज संध्याकाळपासून गजबजणार आहे. भाविकांची अलोट गर्दी येथे पुढील बारा दिवस उसळलेली पहावयास मिळणार आहे. निमित्त आहे, वार्षिक यात्रोत्सव अर्थात उरूसाचे.
नाशिकमधील जुने नाशिक परिसरातील पिंजारघाट रस्त्यावर असलेला बडी दर्गा जातीय सलोखा व राष्टÑीय एकात्मतेचे प्रतीक आहे. सर्वधर्मीय भाविक मनोभावे यात्रेत सहभागी होऊन वार्षिक यात्रोत्सवात सहभागी होतात. दरवर्षी यात्रोत्सव मे महिन्यात साजरा होतो; मात्र यंदा शालेय सुटी लवकर लागल्याने यात्रा एप्रिलमध्येच सुरू झाली आहे.
जुने नाशिकमधील पिंजारघाट परिसरात बडी दर्गा असून दरवर्षी दर्ग्याच्या आवारात यात्रोत्सव भरविण्याची पारंपरिक प्रथा आहे. यंदाचा उरूस ३८९वा असल्याची माहिती हाजी वसीम पीरजादा यांनी दिली आहे. या उरूसमधील ‘फालुदा’ या शीतपेयाचे विशेष आकर्षण असते. जुने नाशिक गावठाण भागातील ही एकमेव पारंपरिक मोठी यात्रा मानली जाते. या यात्रेचा सर्वधर्मीय नागरिक मोठ्या संख्येने आनंद लुटतात. जुने नाशिक परिसर हिंदू-मुस्लीमबुहल परिसर म्हणून ओळखला जातो.  जातीय सलोख्याचे प्रतीक म्हणून बडी दर्गाचा नावलौकिक आहे. यात्रोत्सवानिमित्त बडी दर्ग्यावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.


चोख पोलीस बंदोबस्त
यात्रेसाठी विशेष पोलीस बंदोबस्त पुरविण्यात येणार असून साध्या वेशातील पोलिसांसह महिला पोलिसांची नियुक्ती करण्यात येणार आहे. हा यात्रोत्सव पुढील बारा दिवस सुरू राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, संध्याकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत शहीद अब्दुल हमीद चौकातून पुढे पिंजारघाट मार्गावर चारचाकी वाहनांसह रिक्षांना प्रवेश बंद करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. कुठल्याहीप्रकारची संशयित व्यक्ती अथवा बेवारस वस्तू दर्ग्याच्या परिसरात यात्रेत आढळून आल्यास भाविकांनी शहर पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

भद्रकाली पोलिसांकडून मानाची प्रथम चादर
आज संध्याकाळी पारंपरिक प्रथेनुसार पोलीस आयुक्तालय व भद्रकाली पोलीस ठाण्याच्या वतीने चादरची मिरवणूक काढण्यात येणार आहे. संध्याकाळी सात वाजता भद्रकाली पोलीस ठाण्याच्या आवारातून पारंपरिक प्रथेनुसार मीलादने हुसेनी बाबा यांच्या यात्रोत्सवानिमित्त चादरची मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणूकीत पोलीस आयुक्त, उपआयुक्त, सहाय्यक आयुक्त, पोलीस निरिक्षकांसह शांततासमितीचे सदस्य सहभागी होणार आहे. दरवर्षी यात्रेच्या पहिल्या दिवशी पोलिसांना प्रथम चादर अर्पण करण्याचा मान दिला जातो. मागील अनेक वर्षांपासून ही प्रथा पाळली जाते.

महिला भाविकांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार
बडी दर्गामध्ये यात्रोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी लोटणार असून खबरदारीचा उपाय व सुरक्षिततेच्या दृष्टीने महिलांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वाराची सुविधा पुरविण्यात आली आहे. तसेच वर्षाचे बारामाही महिलांकरिता दर्ग्यात प्रवेशाचा स्वतंत्र मार्ग आहे; मात्र यात्रेनिमित्त या प्रवेशद्वारावर धातुशोधक यंत्रणा व सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. तसेच प्रवेशद्वारावर कुठल्याहीप्रकारे विक्रेत्यांचे अतिक्रमण होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. जेणेकरून महिला भाविकांना दर्ग्यात प्रवेश करताना अडथळ्यांचा सामना करावा लागणार नाही. पाणपोईच्या शेजारून प्रवेशाचा मार्ग देण्यात आला आहे.

 

Web Title: Bhadrakali from Police: all religion devotee of Nashik: Big Darga in old Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.