सीमेवरील गोंदे दुमाल्यात सावधगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 22:16 IST2020-04-06T22:15:15+5:302020-04-06T22:16:00+5:30
नांदूरवैद्य : विविध कारखान्यांत काम करणारे राज्य आणि राज्याबाहेरील मजूर, मुंबईपासून अगदी लगत आणि महामार्गामुळे अगदी धोक्याच्या सीमेवर असलेल्या गोंदे दुमाला ग्रामपंचायतीकडून कोरोनाला रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत.

गोंदे दुमाला येथे ग्रामपंचायतीच्या वतीने तांदळाचे पाच किलो वजनाचे पॅकेट बनवताना सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी करताना सरपंच शरद सोनवणे, सदस्य परशुराम नाठे, शिवराम बेंडकुळे आदी.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदूरवैद्य : विविध कारखान्यांत काम करणारे राज्य आणि राज्याबाहेरील मजूर, मुंबईपासून अगदी लगत आणि महामार्गामुळे अगदी धोक्याच्या सीमेवर असलेल्या गोंदे दुमाला ग्रामपंचायतीकडून कोरोनाला रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत.
गावचे सरपंच शरद सोनवणे, माजी सरपंच गणपत जाधव, उपसरपंच सीताबाई नाठे, ग्रामविकास अधिकारी हनुमान दराडे व कर्मचारी आदींच्या नियोजनातून कोरोना रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने कंबर कसली आहे. इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला ही जिल्ह्यातील अव्वल ग्रामपंचायत आहे. या भागात विविध कारखाने, परप्रांतीय मजूर, महामार्ग आणि नाशिक-मुंबईपासून जवळ असल्याने धोक्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने कोरोना रोखण्यासाठी विविध उपक्र म राबवले आहेत. गावात प्रवेश करताना ग्रामपंचायत कर्मचारी सॅनिटायझर आणि हात धुऊनच नागरिकांना सोडतात.
पारले कंपनीकडून चार हजार बिस्कीट पुडे वाटप आणि सॅमसोनाइटकडून गरीब व रस्त्याने जाणाच्या मजुरांना मोफत जेवण दिले जाते.
इन्फो ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना अतिरिक्त मानधन, जिल्हा परिषद शाळेतील शिल्लक तांदूळ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मदतीने पाच किलोचे पॅकिंग बनवून घरपोच करण्यात आले आहे. कोरोना रोखण्यासाठी काम करणाºया सर्व ग्रामपंचायत कर्मचाºयांना प्रत्येकी एक हजारांचे अतिरिक्त मानधन खात्यावर वर्ग करण्यात आले आहे.नियमित फवारणीजीवनावश्यक साहित्य विक्रीच्या दुकानाबाहेर सामाजिक अंतर पाळण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. संपूर्ण गावात जंतुसंसर्ग रोखण्यासाठी फवारणी नियमितपणे सुरू आहे. गावात नेहमी बसण्याच्या जागांवर कोणी बसू नये म्हणून आॅइल आणि ग्रीसचा आगळावेगळा वापर करण्यात आला आहे. गरीब लोकांना कंपन्यांमार्फत अन्नदानाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.