इगतपुरी : कायद्यापेक्षा भवितव्याच्या दृष्टिकोनातून दक्षता घेतल्यास मुलींचा जन्मदर वाढू शकतो. मुलींच्या जन्माने लक्ष्मी घरात येऊन समृद्धी नांदेल असे प्रतिपादन न्यायमूर्ती करीम खान यांनी केले. इगतपुरी न्यायालयात बेटी बचाव-बेटी पढाव या कार्यक्र मात ते बोलत होते.तालुका विधि सेवा समिती व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने बेटी बचाव-बेटी पढाव, व्हीक्टीम नुकसानभरपाई व ग्राहक हित कायदा या विषयांवर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिवाणी न्यायाधीश करीम खान तर प्रमुख पाहुणे म्हणून दिवाणी न्यायाधीश एल.के. सपकाळ, वकील संघाचे अध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम, सरकारी वकील मनोज तोरणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. वाय. व्ही. कडू, प्रास्ताविक अॅड. रोहित उगले यांनी केले. यावेळी अॅड. विजयमाला वाजे, प्रगती सुरते, आर.जी. वाजे यांनी बेटी बचाव-बेटी पढाव या विषयावर मार्गदर्शन केले.यावेळी शबाना मेमन, पी.बी. गायकर रतनकुमार इचम, नदीम शेख, यशवंत कडू, सागर वालझाडे, संजय जगताप, सुशील गायकर, एस.पी भोसले, निलेश चांदवडकर आदी उपस्थित होते.
इगतपुरी न्यायालयात बेटी बचाव कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 01:31 IST
इगतपुरी : कायद्यापेक्षा भवितव्याच्या दृष्टिकोनातून दक्षता घेतल्यास मुलींचा जन्मदर वाढू शकतो. मुलींच्या जन्माने लक्ष्मी घरात येऊन समृद्धी नांदेल असे प्रतिपादन न्यायमूर्ती करीम खान यांनी केले. इगतपुरी न्यायालयात बेटी बचाव-बेटी पढाव या कार्यक्र मात ते बोलत होते.
इगतपुरी न्यायालयात बेटी बचाव कार्यक्रम
ठळक मुद्देमुलींच्या जन्माने लक्ष्मी घरात येऊन समृद्धी नांदेल