विना अनुदानित शाळांमधील १५०० शिक्षकांना लाभ

By Admin | Updated: May 7, 2014 22:57 IST2014-05-07T21:49:38+5:302014-05-07T22:57:59+5:30

नाशिक : विना अनुदानित शाळांमध्ये केलेली सेवा शिक्षकांची वेतननिश्चिती, भविष्य निर्वाह निधी, पदोन्नती, सेवाज्येष्ठता आदिंसाठी ग्रा‘ धरली जावी.

Benefits of 1500 teachers in unaided schools | विना अनुदानित शाळांमधील १५०० शिक्षकांना लाभ

विना अनुदानित शाळांमधील १५०० शिक्षकांना लाभ

नाशिक : विना अनुदानित शाळांमध्ये केलेली सेवा शिक्षकांची वेतननिश्चिती, भविष्य निर्वाह निधी, पदोन्नती, सेवाज्येष्ठता आदिंसाठी ग्रा‘ धरली जावी, असा महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतल्याने त्याचा लाभ जिल्‘ातील सुमारे १३०० ते १५०० माध्यमिक शिक्षकांना होणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी नवनाथ औताडे यांनी दिली.
मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. याआधी विना अनुदानित शाळेत सेवा करणार्‍या शिक्षकांची सेवा संबंधित शाळा जोवर अनुदान तत्त्वावर येत नाही तोवर ग्रा‘ धरली जात नव्हती. आता या निर्णयामुळे विना अनुदानित शाळेत केलेली सेवा ग्रा‘ धरली जाणार असल्याने शिक्षकांना त्याचा फायदा होणार आहे. शासनाच्या या निर्णयाचा राज्यातील सुमारे ५० हजार शिक्षकांना फायदा होणार असून, नाशिक जिल्‘ातील सुमारे १३०० ते १५०० शिक्षकांना या शासननिर्णयाचा लाभ होणार असल्याचे औताडे यांनी सांगितले. विना अनुदानित तत्त्वावरील शाळेत शिक्षक कार्यरत असल्यास त्यास वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ घेण्यासाठी शाळा अनुदान तत्त्वावर येणे आवश्यक ठरत असे. इतकेच नव्हे, तर त्या शिक्षकाने आधी केलेली सेवाही वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी ग्रा‘ धरली जात नसे. आता शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे २००६ पासून विना अनुदान तत्त्वावर शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकांची सेवा त्यावेळेपासून ग्रा‘ धरली जाणार असल्याने शिक्षकांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Benefits of 1500 teachers in unaided schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.