बंदिस्त वाघाड कालव्याला लाभधारक शेतकऱ्यांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 20:55 IST2019-09-03T20:54:50+5:302019-09-03T20:55:28+5:30
दिंडोरी : तालुक्यातील वाघाड डाव्या व उजव्या कालव्यावरील सिंचनाचे पाणी बंदिस्त पाईपलाईनद्वारे नेण्याचा घाट वाघाझ प्रकल्पस्तरीय पाणी वाटप संस्थेने घातला जात आहे. पंरतु निळवंडी पाडे, हातनोरे, वलखेड, दिंडोरी, मडकीजाम, वनारवाडी आदी पश्चिम भागातील लाभधारक शेतकऱ्यांनी बंदिस्त पाईपलाईनला तीव्र विरोध दर्शविला आहे.

बंदिस्त वाघाड कालव्याला लाभधारक शेतकऱ्यांचा विरोध
दिंडोरी : तालुक्यातील वाघाड डाव्या व उजव्या कालव्यावरील सिंचनाचे पाणी बंदिस्त पाईपलाईनद्वारे नेण्याचा घाट वाघाझ प्रकल्पस्तरीय पाणी वाटप संस्थेने घातला जात आहे. पंरतु निळवंडी पाडे, हातनोरे, वलखेड, दिंडोरी, मडकीजाम, वनारवाडी आदी पश्चिम भागातील लाभधारक शेतकऱ्यांनी बंदिस्त पाईपलाईनला तीव्र विरोध दर्शविला आहे.
बंदिस्त पाईपलाईनद्वारे सिंचनाचे पाणी नेण्याच्या विरोधात लाभधारक शेतकरी एकवटले असून दिंडोरी शहरातून मुक मोर्चा काढून तहसीलदार बाबासाहेब गाढवे यांना निवेदन देवून संताप व्यक्त केला.
वाघाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थाचा महासंघ या संस्थेने वाघाङ उजव्या व डाव्या कालव्यावर शेती सिंचनाचे पाणी बंदिस्त पाईपलाईनद्वारे नेण्याचा योजना आखली आहे. परंतु अनेक उचल व प्रवाही पाणी संस्था अंतर्गत लाभधारक शेतकºयांचे बंदिस्त पाईपलाईनमुळे सिंचनासाठी पाण्याचे समन्यायिक पध्दतीने वाटप होवू शकणार नाही.
बागायती क्षेत्र उजाड होण्याची भिती लाभधारक शेतकºयांकडून व्यक्त केली जात आहे. यावेळी पंचाय समितीचे उपसभापती कैलास पाटील, खरेदी विक्र ी संघाचे संचालक दिलीप जाधव, दिनकर जाधव, रघुनाथ पाटील आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.