शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

रेशन दुकानदार ठरविणार लाभार्थी

By admin | Updated: November 15, 2016 02:27 IST

उफराटे पुरवठा खाते : लाभ मिळण्याविषयी साशंकता

नाशिक : रेशनच्या काळ्याबाजारासाठी नेहमीच रेशन दुकानदारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणाऱ्या पुरवठा खात्याने आता मात्र रेशन दुकानदारांच्या या गैरकृत्यात सामील होण्याचा उघड उघड पवित्राच घेतला असून, शासनाने अंत्योदय व केशरी शिधापत्रिकाधारकांनाही स्वस्त दरात रेशन उपलब्ध करून देण्याचे ठरविले असता, त्याचे लाभार्थी निश्चित करण्याचे काम थेट रेशन दुकानदारांवरच सोपविण्यात आले आहे. त्यामुळे खऱ्या लाभेच्छुकापर्यंत हा लाभ पोहोचण्याविषयी साशंकता व्यक्त केली जात असताना ‘कोळशाच्या दलालीत हात काळे’ नको म्हणून रेशन दुकानदारांनीही यातून अंग काढून घेण्याची भूमिका घेतली आहे. केंद्र व राज्य सरकारने बीपीएल म्हणजेच दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या यादीतील लाभार्थी कमी करून त्यांना अंत्योदय योजनेत वर्ग करण्याचा निर्णय घेतला असून, त्याचबरोबर ज्या केशरी शिधापत्रिकाधारकांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ आजवर मिळालेला नाही, अशांचे वार्षिक उत्पन्न लक्षात घेऊन त्यांनाही अन्नसुरक्षा योजनेचा लाभ देण्याचा म्हणजेच दोन रुपये किलो तांदूळ व तीन रुपये किलो गहू रेशनच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचे ठरविले आहे, त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. यातील महत्त्वाचे म्हणजे ज्याला खरोखरच गरज आहे अशा गरीब लाभेच्छुकाची निवड करून त्यालाच या योजनेचा लाभ मिळावा, असे शासनाने अपेक्षित धरले आहे. अर्थातच हे काम पुरवठा यंत्रणेनेच करावे असे शासनाचे स्पष्ट निर्देश असताना नाशिक जिल्ह्यात मात्र लाभार्थी निश्चित करण्याचे काम पुरवठा यंत्रणेने थेट रेशन दुकानदारांच्या हाती सोपविले आहे. रेशन दुकानदारांनीच आपल्या भागातील गोरगरिब (?) शोधून त्यांच्या याद्या पुरवठा खात्याला सादर कराव्या, अशा सूचना पुरवठा खात्याने रेशन दुकानदारांना दिल्या आहेत. अर्थातच आजवर जे रेशन दुकानदार पुरवठा खात्याच्या लेखी काळाबाजार करणारे ठरले तेच रेशन दुकानदार लाभार्थी ठरविणार असल्याने त्याचा खरा लाभ गोरगरिबांना मिळण्याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. पुरवठा खात्याच्या सांगण्यावरून परस्पर लाभार्थी ठरविल्यानंतर होणारे आरोप व तक्रारी लक्षात घेता नसते खापर फुटण्याच्या भीतीने आता रेशन दुकानदारांनीच लाभेच्छुकांची यादी देण्यास करण्यास नकार दिला आहे. (प्रतिनिधी)