खाट विणकामातून साधली उद्योगाची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 06:06 PM2020-09-09T18:06:50+5:302020-09-09T18:09:18+5:30

सायगाव : येथील युवावर्गाने युवक समूहाच्या माध्यमातून शेततळ्यांचा कागद बसवणे, फळबागांची छाटणी करणे, केटरिंग व्यवसाय, ठिबक व तुषार सिंचन फिटिंग, विजेचे खांब उभे करणे, तालुक्यात गावोगावी समूहाने जाऊन विद्युत सेवा देणे आदी बाबींमध्ये नावलौकिक मिळवला आहे, तर सायगाव येथील कैलास निघुट या तरु णाने आपल्या खाट (बाज) विणण्याच्या कलेच्या माध्यमातून गावातील अनेकांना रोजगार संधी उपलब्ध करून दिली आहे.

Bed weaving industry opportunities | खाट विणकामातून साधली उद्योगाची संधी

खाट विणकामातून साधली उद्योगाची संधी

googlenewsNext
ठळक मुद्देसायगाव येथील युवकाचा कोरोनाकाळात संघर्ष

सायगाव : येथील युवावर्गाने युवक समूहाच्या माध्यमातून शेततळ्यांचा कागद बसवणे, फळबागांची छाटणी करणे, केटरिंग व्यवसाय, ठिबक व तुषार सिंचन फिटिंग, विजेचे खांब उभे करणे, तालुक्यात गावोगावी समूहाने जाऊन विद्युत सेवा देणे आदी बाबींमध्ये नावलौकिक मिळवला आहे, तर सायगाव येथील कैलास निघुट या तरु णाने आपल्या खाट (बाज) विणण्याच्या कलेच्या माध्यमातून गावातील अनेकांना रोजगार संधी उपलब्ध करून दिली आहे.
सर्वसामान्य शेतकरी मजूर कुटुंबातील कैलास वामन निघुट या तरुणाचे शिक्षण जेमतेम दहावीपर्यंत झाले आहे. स्वत:च्या अल्पशेतीवर उदरनिर्वाह शक्य नसल्याने त्याने स्वमालकीच्या बैलांद्वारे वखरणी, कोळपणी, पेरणी आदी शेतीकामे करून संसाराचा गाढा हाकत असताना बाज विणण्याचा छंद जोपासला. लहानपणापासून साधी बाज विणण्याची कला त्याला अवगत होती. एक वर्षापूर्वी गुंतागुंतीचे विणकाम असलेली आहिराऊ प्रकारातली बाज विणण्याचे कुठल्याही प्रशिक्षणाविना कैलास शिकला. यातून त्याचा आत्मविश्वास दृढ झाला आणि बाज विणण्याच्या कलेचे यू ट्यूबवर त्याने अनेक व्हिडिओ बघून रंगीबेरंगी, नक्षिकामाच्या, वेगवेगळ्या कला कौशल्य संपन्न अशा बाजी विणण्यास सुरु वात केली.
एक बाज विणण्यासाठी डिझाईननुसार सात किलोपर्यंत रंगीबेरंगी दोरी लागते तर एक बाज विणण्यासाठी किमान दोन दिवस लागतात. कैलासने विणलेल्या बाजीला मागणी सुरू झाली आहे. यातून अपेक्षेपेक्षा जास्त पैसे देऊन बाज विणून घेणाऱ्या कला शौकिनांची प्रतीक्षायादी आज त्याच्याकडे तयार आहे.
कोट
कैलासला या व्यवसायात जर योग्य मार्गदर्शन सल्ला मिळाला तसेच गावातील काही युवकांना त्याने प्रशिक्षित केले तर नागडे, येवला जसे पैठणी विणकरांचे ओळखले जाते तसे सायगाव हे बाज विणणाऱ्यांचे म्हणून ओळखले जाऊन पुन्हा एकदा नव्या व्यवसायात सायगावचा युवकांचे पदार्पण होऊ शकते. पैैठणी विणकाम धर्तीवर सायगावमध्ये बाज विणणे हा लघुउद्योग सुरू होऊ शकतो. यातून स्थानिकांना रोजगाराच्या संधीही निर्माण होतील.
- भागुनाथ उशीर, माजी सरपंच, सायगाव
 

Web Title: Bed weaving industry opportunities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.