उपसरपंचपदी बेबीताई थोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 01:09 IST2020-08-04T21:01:38+5:302020-08-05T01:09:28+5:30
दरेगाव : तालुक्यातील मेसनखेडे ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बेबीताई विष्णू थोरात यांची निवड करण्यात आली.

चांदवड तालुक्यातील मेसनखेडे ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बेबीताई थोरात यांच्या निवडीप्रसंगी सरपंच भाग्यश्री ठोंबरे, मावळत्या सरपंच अर्चना थोरात, कल्पना बिडगर, अलका थोरात, संगीता चंदन , बाबाजी पवार, नरेंद्र पगारे, संदीप ठोंबरे, कैलास माळी, किरण गायकवाड, अंबादास ठोंबरे व सदस्य.
ठळक मुद्देसरपंच भाग्यश्री ठोंबरे यांच्या अध्यक्षेखाली सभा घेण्यात आली.
दरेगाव : तालुक्यातील मेसनखेडे ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बेबीताई विष्णू थोरात यांची निवड करण्यात आली. मावळत्या उपसरपंच अर्चना विष्णू थोरात यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदाच्या निवडीसाठी सरपंच भाग्यश्री ठोंबरे यांच्या अध्यक्षेखाली सभा घेण्यात आली. यावेळी बाबाजी पवार, नरेंद्र पगारे, संदीप ठोंबरे, कैलास माळी, किरण गायकवाड, कल्पना बिडगर, अर्चना थोरात, अलका थोरात, संगीता चंदन उपस्थित होते.