शेतीच्या वादातून मारहाण; एक गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 01:14 IST2020-01-18T00:26:04+5:302020-01-18T01:14:20+5:30
रायपूर शिवारात शेतीच्या वादातून झालेल्या मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाला. त्यांच्यावर चांदवड उपजिल्हा रुग्णालयात औषधोेपचार करून अधिक उपचारासाठी नाशिकला रवाना केले. त्यांची प्रकृती सुधारत असून, याप्रकरणी चांदवड पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.

शेतीच्या वादातून मारहाण; एक गंभीर जखमी
चांदवड : तालुक्यातील रायपूर शिवारात शेतीच्या वादातून झालेल्या मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाला. त्यांच्यावर चांदवड उपजिल्हा रुग्णालयात औषधोेपचार करून अधिक उपचारासाठी नाशिकला रवाना केले. त्यांची प्रकृती सुधारत असून, याप्रकरणी चांदवड पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.
रायपूर शिवार भडाणे येथे मनमाड - लासलगाव रस्त्यावर गट नंबर ६०५ या जमिनीवरून श्रीमती नलिनी शेजवळ आणि राजेंद्र निवृत्ती पानपाटील (भाऊ -बहीण) यांच्यात वाद सुरू होते. सदर जमिनीचे खातेवाटप होऊनसुद्धा राजेंद्र पानपाटील यांनी सर्व जमिनीवर कब्जा घेऊन पीक पेरणी केली. याबाबत नलिनी शेजवळ यांच्या बहिणीचा मुलगा भगवान प्रभाकर बोढारे यांना त्यांचे वाटेची जमीन करण्यास सांगितले. त्यानुसार भगवान बोढारे हे शेतात गेले असता दि. ४ जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास राजेंद्र पानपाटील व त्यांचा मुलगा किशोर पानपाटील यांनी झाडामागे लपून भगवान बोढारे व त्यांचे काका नामदेव शेजवळ मोटारसायकलवर रस्त्याने जात असताना रस्ता ओलांडताना थांबलेले पाहून मागून येऊन राजेंद्र पानपाटील व किशोर पानपाटील यांनी तलवारीने हल्ला केला, तर बोढारे यांची मुलगी कावेरी बोढारे, पत्नी सुनीता बोढारे हे त्यांना वाचविण्यासाठी गेले असता त्यांच्यावरही काठीने वार केले. राजेंद्र पानपाटील यांची पत्नी सुभाबाई व सून दामिनी पानपाटील यांनीदेखील काठीने व कुºहाडीने मारहाण करण्यास सुरुवात केली. यात भगवान बोढारे यांना गंभीर मार लागल्याने चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. चांदवड पोलिसांनी हाणामारीच्या घटनेबाबत गुन्हा दाखल करून राजेंद्र पानपाटील व किशोर पानपाटील यांना अटक केली तर राजेंद्र पानपाटील यांना नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवाना केले, तर किशोर पानपाटील हा चांदवड पोलीस स्टेशनमध्ये आहे.
याबाबत चांदवडचे
पोलीस निरीक्षक हिरालाल
पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र सौंदाणे हे तपास करीत आहेत.
दोघांना अटक; एकाची रवानगी कारागृहात
चांदवड पोलिसांनी हाणामारीच्या घटनेबाबत गुन्हा दाखल करून राजेंद्र पानपाटील व किशोर पानपाटील यांना अटक केली. राजेंद्र पानपाटील यांना नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवाना केले, तर किशोर पानपाटील हा चांदवड पोलीस स्टेशनमध्ये आहेत.