महिलेला मारहाण; संशयितांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 00:30 IST2020-08-06T21:56:25+5:302020-08-07T00:30:09+5:30

वणी : वनविभागाच्या जमिनीत नांगरण्याच्या मुद्द्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याने महिलेच्या तक्रारीवरून पाच संशयितांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Beating a woman; Crime on suspects | महिलेला मारहाण; संशयितांवर गुन्हा

महिलेला मारहाण; संशयितांवर गुन्हा

ठळक मुद्देसंशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वणी : वनविभागाच्या जमिनीत नांगरण्याच्या मुद्द्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याने महिलेच्या तक्रारीवरून पाच संशयितांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भातोडे येथे वनजमिनीत काही लोकांनी प्लॉट काढले आहेत. काहींना जमिनीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्रशासकीय कार्यप्रणाली सुरू आहे. संबंधित महिलेचीही प्रक्रिया सुरू आहे. भातोडे ग्रामपंचायतीसमोर सदर महिला व साक्षीदार उभे असताना वनविभागाच्या जमिनीत नांगरण्याच्या मुद्द्यावरून महिलेशी तेथे उपस्थित असणाऱ्यांनी वाद घातला. या महिलेला काठीने मारहाण करत साक्षीदारासमोर धमकी दिल्याची फिर्याद दिल्याने संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Beating a woman; Crime on suspects