पोलिसांकडून मारहाण, आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 00:42 IST2021-05-12T23:27:20+5:302021-05-13T00:42:59+5:30
नाशिक : जिल्ह्यात कडक निर्बंध लागू झाल्यानंतर पोलिसांकडून अकारण अडवणूक करून वाहतूक कर्मचाऱ्यांना मारहाण केली जात असल्याची तक्रार नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनने पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे. पोलिसांनी असे प्रकार केल्यास अत्यावश्यक सेवा असलेल्या मालाची वाहतूक बंद करण्याचा इशाराही संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र फड यांनी दिला आहे.

कडक निर्बंध असले, तरी ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना अत्यावश्यक मालाची वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, अशा प्रकारे कागदपत्रे दाखवूनही पोलिसांकडून मारहाण केल्याचे प्रकार घडत असून, ते निषेधार्ह आहेत. यावर प्रशासनाने सुस्पष्ट आदेश द्यावेत आणि पोलीस यंत्रणेला तसे सूचित करावे, अन्यथा जीवनावश्यक मालाची वाहतूक बंद करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.