घरात घुसून मारहाण, एकाविरूद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 13:29 IST2020-02-13T13:29:03+5:302020-02-13T13:29:32+5:30

वणी : मध्यरात्रीनंतर घराचा दरवाजा उघडून बेकायदेशीर प्रवेश करु न काठीने मारहाण करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 Beating a house, committing a crime | घरात घुसून मारहाण, एकाविरूद्ध गुन्हा

घरात घुसून मारहाण, एकाविरूद्ध गुन्हा

वणी : मध्यरात्रीनंतर घराचा दरवाजा उघडून बेकायदेशीर प्रवेश करु न काठीने मारहाण करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिंडोरी तालुक्यातील खोरी येथे किरण लक्ष्मण कवर (३८) हे घराच्या ओट्यावर झोपलेले असताना मध्यरात्रीनंतर सुमारे २ वाजुन ४५ मिनिटाच्या सुमारास साहेबराव चिंतामण गायकवाड राहणार खोरी हा या ठिकाणी आला. त्याने कवर यांच्या घराचा दरवाजा उघडुन आत प्रवेश केला. यावेळी कवर यांना जाग आली व ते घरात गेले. गायकवाड याने काठीने कवर यांना मारहाण केली व त्यात ते जखमी झाले. गायकवाड यांचा मुलगा अरूण त्यांना वाचविण्यासाठी आला असता त्याचा हात पिरगाळला, अशी फिर्याद कवर यांनी गायकवाड यांच्याविरोधात दाखली केली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title:  Beating a house, committing a crime

टॅग्स :Nashikनाशिक