प्रेयसीच्या वादावरून मित्रास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 00:18 IST2020-01-20T22:37:54+5:302020-01-21T00:18:27+5:30

पंधरा वर्षांपासून एकत्र राहत असलेल्या आपल्या प्रेयसीशी मित्राचे प्रेम संबंध असल्याच्या संशयावरून एकाने मित्रास धारदार शस्राने वार करून जखमी केले. छावणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

Beating a friend over a dispute with a loved one | प्रेयसीच्या वादावरून मित्रास मारहाण

प्रेयसीच्या वादावरून मित्रास मारहाण

ठळक मुद्देमालेगाव : छावणी पोलिसात गुन्हा दाखल

मालेगाव : गेल्या पंधरा वर्षांपासून एकत्र राहत असलेल्या आपल्या प्रेयसीशी मित्राचे प्रेम संबंध असल्याच्या संशयावरून एकाने मित्रास धारदार शस्राने वार करून जखमी केले. छावणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
अशोक कौतिक वाघ (३५) रा. बालाजीनगर सोयगाव याने त्याचा मित्र समाधान जिभाऊ अहिरे (३३) रा. रोकडोबानगर, दाभाडी याला धारदार शस्राने वार करून जखमी केल्याची घटना रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास जुना आग्रारोडवर निसर्ग हॉटेलजवळ घडली. समाधान अहिरे याने छावणी पोलिसात फिर्याद दिली. अशोक वाघ याचे एका महिलेशी प्रेमसंबंध असून, पंधरा वर्षांपासून एकत्र राहतात. परंतु समाधान अहिरे याचेही तिच्याशी प्रेमसंबंध असल्याचा संशय अशोकला होता. त्यावरून त्याचे वाद सुरू होते. काल अशोक वाघ याने प्रेयसी व तिच्या नातेवाइकांना निसर्ग हॉटेलजवळ बोलवून चर्चा करून आपण वाद मिटवू असे सांगितले. फिर्यादी समाधान अहिरे व त्याच्या मित्रांनाही बोलावून घेतले. फिर्यादी व आरोपी दोघे एका दुचाकीवर बसून छावणी पोलीस ठाण्यात जात असताना अशोक वाघ याने तुझे माझ्या प्रेयसीशी प्रेम संबंध असल्याचे सांगून त्याच्या पाठीवर, पोटावर, मानेवर शस्राने वार केले. वार वाचविताना फिर्यादी समाधान अहिरे याच्या हाताच्या पंज्याला दुखापत झाली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Web Title: Beating a friend over a dispute with a loved one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.