बसचालकासह वाहकास मारहाण

By Admin | Updated: August 30, 2016 01:23 IST2016-08-30T01:16:55+5:302016-08-30T01:23:09+5:30

बसचालकासह वाहकास मारहाण

Beating the driver with the operator | बसचालकासह वाहकास मारहाण

बसचालकासह वाहकास मारहाण

 नाशिक : दुचाकीवर आलेल्या तीन संशयितांनी बस अडवून बसचालक व वाहकास मारहाण केल्याची घटना बिटको पॉइंटजवळ घडली़ याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात
मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
शहर वाहतुकीच्या बसवरील (एमएच १४, बीटी ३७३) चालक सुभाष विठ्ठल कुटे (४१, रा़ बेलतगव्हाण) हे भगूरहून शालिमारकडे बस घेऊन जात होते़ त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर (एमएच १५, ईसी ५८४१) आलेल्या तीन संशयितांनी बस बाजूला घेण्यास सांगितली़ त्यानुसार बस बाजूला घेतली असता हे तिघे बसमध्ये आले व त्यांनी बसचालक कुटे व बसवाहक गोरख पगारे यांना शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली़
बसचालक कुटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उपनगर पोलिसांनी दुचाकीवरील तिघा संशयितांविरोधात सरकारी कामात अडथळा, तसेच मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Beating the driver with the operator