मद्यपी चोरट्यांकडून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 01:11 IST2021-02-24T19:31:46+5:302021-02-25T01:11:17+5:30

नाशिक : द्वारका परिसरात मद्यसेवन केल्यानंतर संशयित चोरट्याने फिर्यादी तौफिक चाँद सय्यद (२४, रा. मालेगाव) यांना बळजबरीने दुचाकीवर बसवून गोदावरी नदीजवळील एका पुलाखाली नेले. तेथे चोरट्याने त्याच्या दोन साथिदारांना बोलवून घेत तौफिक यास लाकडी दांड्याने मारहाण केली.

Beaten by drunken thieves | मद्यपी चोरट्यांकडून मारहाण

मद्यपी चोरट्यांकडून मारहाण

ठळक मुद्देखिशातून ४८ हजार रुपयांची रोकड व मोबाइल काढून घेत पोबारा

नाशिक : द्वारका परिसरात मद्यसेवन केल्यानंतर संशयित चोरट्याने फिर्यादी तौफिक चाँद सय्यद (२४, रा. मालेगाव) यांना बळजबरीने दुचाकीवर बसवून गोदावरी नदीजवळील एका पुलाखाली नेले. तेथे चोरट्याने त्याच्या दोन साथिदारांना बोलवून घेत तौफिक यास लाकडी दांड्याने मारहाण केली.

या मारहाणीत तौफिकच्या डोळ्यास दुखापत झाली. तसेच चोरट्यांनी तौफिकच्या खिशातून ४८ हजार रुपयांची रोकड व मोबाइल काढून घेत पोबारा केला . याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Beaten by drunken thieves