बीट मार्शल पोलिसांच्या दुचाकीला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:39 IST2021-02-05T05:39:05+5:302021-02-05T05:39:05+5:30

----- राहत्या घराजवळून बुलेट लंपास नाशिक : शहर व परिसरात दुचाकी चोरीचा सिलसिला सुरूच असून पंचवटी कारंजा भागातून एका ...

Beat Marshall hits police bike | बीट मार्शल पोलिसांच्या दुचाकीला धडक

बीट मार्शल पोलिसांच्या दुचाकीला धडक

-----

राहत्या घराजवळून बुलेट लंपास

नाशिक : शहर व परिसरात दुचाकी चोरीचा सिलसिला सुरूच असून पंचवटी कारंजा भागातून एका राहत्या घराजवळून बुलेट अज्ञात संशयितांनी चोरी केल्याची घटना घडली. याप्रकरणी केशव धोंडू गुंजाळ (जोशी वाडा, पंचवटी) यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या मालकीची काळ्या रंगाची बुलेट (एम.एच१५ जीएन००११) अज्ञात चोरट्याने राहत्या घराजवळून रात्रीच्या सुमारास लांबविली. दुसऱ्या घटनेत दिंडोरीनाका येथून फिर्यादी विष्णू कारभारी ढाकणे (रा.उदय कॉलनी, मखमलाबादनाका) यांच्या मालकीची दुचाकी (एम.एच१५ बीई ६४३४) अज्ञात चोरट्याने पंचवटी परिसरातील एका बँकेसमोर उभी केली असता भरदिवसात लांबविली. याप्रकरणी त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

---

शहरात तीन जबरी चोऱ्या

नाशिक : शहर व परिसरात जबरी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून गंगापूररोड, आडगाव, सातपूर भागात मोबाइलचोरी, घरफोडी, मारहाण करत जबरी लूट केल्याचे उघडकीस आले आहे.

गंगापूररोड सावरकरनगर या भागात फिर्यादी मोनिल दिलीप डगळी (३५) हा युवक रात्री १० वाजेच्या सुमारास रस्त्याने पायी जात असताना त्याच्या हातातील मोबाइल पल्सर दुचाकीस्वारांनी हिसकावून पळ काढला. दुसऱ्या घटनेत आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील समर्थनगर भागात चोरट्याने घरफोडी करत ४२ हजारांची रोकड,२८ ते ३० हजारांचे दागिने असा सुमारे ८० हजारांचा ऐवज लुटल्याची घटना घडली. याप्रकरणी चारुलता महेश भारंबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---

चक्कर येऊन कोसळल्याने दोघे मृत्युमुखी

नाशिक : आनंदवली व अशोका मार्ग परिसरात पन्नाशी ओलांडलेल्या दोघा पुरुषांचा अचानक चक्कर येऊन कोसळल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. आनंदवली येथील मारुती मंदिराजवळ जयदेव रामभाऊ रणबावळे (५०), हे राहत्या घराजवळ चक्कर येऊन पडले. तसेच अशोका मार्गावरील मारुती आर्केड येथे राहत्या घराजवळ सुनील महादेव सांबरेकर (५९) यांनाही चक्कर आल्याने ते कोसळले. यामध्ये त्यांचाही मृत्यू झाला. याप्रकरणी मुंबईनाका, गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---

Web Title: Beat Marshall hits police bike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.