शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

बासमतीचा सुगंध ११० रुपयांनी महागला!

By admin | Published: November 18, 2015 11:49 PM

बाजारातील सुरुवातच तेजीने : तुरडाळीपाठोपाठ तांदळालाही आला ‘भाव’

नाशिक : तुरडाळीच्या भाववाढीतून नागरिक सावरत नाही तोच तांदळाचा बाजारही अचानकपणे तेजीत आल्याने व्यापाऱ्यांबरोबरच नागरिकदेखील अवाक् झाले आहे. उच्च प्रतीच्या बासमती तांदळाच्या दरात किरकोळ बाजारात किलोमागे १०० ते ११० रुपयांनी वाढ झाली आहे. बासमती तांदळाचे विविध प्रकार बाजारात उपलब्ध आहेत; मात्र जुन्या तांदळाला नवीन तांदळाच्या तुलनेत कमी मागणी मिळते. त्यामुळे बाजारात तांदळाचे दर येत्या काही दिवसांमध्ये अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.दिवाळी आटोपल्यानंतर बाजारात येणारा नवीन तांदूळ तसेच आगामी लग्नसराई यामुळे तांदळाला मागणी अधिक वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर तांदळाचा होणारा पुरवठा कमी पडल्यास बाजारात मागणी जास्त अन् पुरवठा कमी अशी स्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहे. त्यामुळे सध्या तांदळाचा दर अधिक उंची गाठण्याची शक्यता व्यावसायिकांकडून वर्तविली जात आहे. तांदळाचा साठा शासनाकडून करण्यात आल्याने तसेच तांदळाची निर्यात व अल्पवृष्टीचाही फटका तांदूळ उत्पादनाला बसला आहे. किरकोळ बाजारात चांगल्या प्रतीचा बासमती तांदूळ ७०-८० रुपये प्रति किलो दराने मिळत होता; मात्र सध्या १८० रुपयांपर्यंत चांगल्या प्रतीच्या बासमतीचा भाव पोहोचला आहे. (प्रतिनिधी)