पंचायत राज व्यवस्थेचा मूळ पाया ग्रामविकासातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:11 IST2021-07-09T04:11:07+5:302021-07-09T04:11:07+5:30
कोरोना काळातील आव्हाने खूप होती. या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी निव्वळ कार्यालयात बसून अधिकाऱ्यांना सूचना देण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन ...

पंचायत राज व्यवस्थेचा मूळ पाया ग्रामविकासातच
कोरोना काळातील आव्हाने खूप होती. या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी निव्वळ कार्यालयात बसून अधिकाऱ्यांना सूचना देण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन बैठका घेतल्या. त्यामुळे अधिकाऱ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत तर झालीच, परंतु प्रत्यक्ष काम करताना काय अडचणी येतात याचा अंदाज बांधणे व ते सोडविणेही सोपे झाले. असे सांगून बनसोड यांनी नाशिक जिल्ह्याची जडणघडण अतिशय वेगळी असून, आदिवासी व बिगर आदिवासी तालुक्याचा मिलाफ असल्याने त्याची सांगड घालण्याचे काम अवघड असले तरी, अधिकारी व लोकप्रतिनिधींचा समन्वय व संवादातून ते सहज शक्य होत असल्याचेही सांगितले.
चौकट==
मनरेगा प्रगतीचा मार्ग
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही गाव विकासाचा प्रगतीचा मार्ग आहे. कोट्यवधी रुपयांच्या कामांतून गावांचा विकास साधता येतोच शिवाय शेतकऱ्यांची व्यक्तिगत कामेही यातून करता येतात. त्यातून सर्वांगीण विकास होऊ शकतो. त्याचाच भाग म्हणून लाॅकडाऊनच्या काळात सुमारे ४३ हजार इतके मजूर रोहयोच्या कामांवर हजर राहण्याचा विक्रमही नोंदविला गेला आहे. गावातच काम उपलब्ध होणार असल्याने यातून स्थलांतराला आळा बसण्यास मदत होत असल्याचेही लीना बनसोड यांनी सांगितले.
(फोटो ०८ लीना)