अधिकाऱ्यांच्या अचानक भेटीने व्यापाऱ्यांची तारांबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 00:55 IST2021-03-31T22:58:04+5:302021-04-01T00:55:03+5:30
ओझर : निफाड तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दररोज मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ओझर शहरातदेखील मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत असल्याने येथील नागरिक पाहिजे तशी काळजी घेताना दिसत नाहीत. याच पार्श्वभूमीवर पोलीस उपअधीक्षक अर्जुन भोसले, निफाड तहसीलदार शरद घोरपडे, गटविकास अधिकारी संदीप कराड यांनी सुकेना, ओझरला अचानक भेट देत शासनाचे कोरोना आजाराचे नियम न पाळणाऱ्या अनेक व्यावसायिकांवर व मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर सुमारे ३५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली.

ओझरला संभाजी चौक येथे व्यावसायिकांना सूचना करतांना अधिकारी.
ओझर : निफाड तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दररोज मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ओझर शहरातदेखील मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत असल्याने येथील नागरिक पाहिजे तशी काळजी घेताना दिसत नाहीत. याच पार्श्वभूमीवर पोलीस उपअधीक्षक अर्जुन भोसले, निफाड तहसीलदार शरद घोरपडे, गटविकास अधिकारी संदीप कराड यांनी सुकेना, ओझरला अचानक भेट देत शासनाचे कोरोना आजाराचे नियम न पाळणाऱ्या अनेक व्यावसायिकांवर व मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर सुमारे ३५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली.
नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त रुग्ण सध्या निफाड तालुक्यात उपचार घेत असून, त्या तुलनेत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण अत्यंत कमी बघायला मिळत आहे . तालुक्यातील अनेक मोठ्या गावांमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमालीची वाढत असताना नागरिक शासनाने दिलेले नियम पाळत नसून गर्दी करत आहेत. त्याचाच परिणाम कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
मंगळवारी दुपारी पोलीस उपअधीक्षक अर्जुन भोसले, निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे, गटविकास अधिकारी संदीप कराड, पोलीस निरीक्षक अशोक रहाटे, उपनिरीक्षक गणपत जाधव , विस्तार अधिकारी के. टी. गादड, तलाठी उल्हास देशमुख, मंडल अधिकारी प्रशांत तांबे यांनी बाजारपेठ येथील बाजारतळ, मेनरोड, कासार गल्ली या भागात अनेक व्यावसायिक व्यापारी वर्गावर नियम पाळल्यामुळे दंडात्मक १०० ते ५ हजार रुपयांपर्यंत कारवाई केली. ओझर येथील होलसेल टेक्स्टाईल मार्केट चालकांकडून प्रत्येकी पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला, तर त्यांना सर्व कर्मचाऱ्यांच्या रॅपिड टेस्ट करण्याचा सूचना करण्यात आल्या.
मास्क न घालणाऱ्यांना दणका
शासकीय अधिकारी अचानक भेटीसाठी आल्याने रस्त्याने फिरणाऱ्या नागरिकांना मास्क न घातल्यामुळे दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचे गरजेचे असल्याचे आवाहन यावेळी निफाड तहसीलदार शरद घोरपडे यांनी केले. व्यावसायिकांनीदेखील नियम न पाळल्यास पुन्हा दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.