तिसगाव सोसायटी अध्यक्षपदी बारकू अहिरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 01:19 IST2020-09-24T19:24:00+5:302020-09-25T01:19:23+5:30

उमराणे : देवळा तालुक्यातील तिसगाव येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बारकू अहिरे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

Barku Ahire as the President of Tisgaon Society | तिसगाव सोसायटी अध्यक्षपदी बारकू अहिरे

तिसगाव सोसायटी अध्यक्षपदी बारकू अहिरे

ठळक मुद्देभाऊसाहेब पवार यांनी पदाचा राजीनामा दिला होता.

उमराणे : देवळा तालुक्यातील तिसगाव येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बारकू अहिरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. आवर्तन पद्धतीनुसार पदाचा कार्यकाळ संपल्याने मावळते अध्यक्ष भाऊसाहेब पवार यांनी पदाचा राजीनामा दिला होता. परिणामी रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी सोसायटीच्या कार्यालयात देवळा तालुका सहायक निबंधक कार्यालयाचे अध्यासी अधिकारी डी. एन. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलविण्यात आली होती. निवडप्रक्रि या पार पाडण्यासाठी सचिव भास्कर मोरे, उत्तम अहेर यांनी सहकार्य केले. याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख देवानंद वाघ, सोसायटीचे संचालक बुधा सोनवणे, देवराम देवरे, माणिक जाधव, रवींद्र अहेर, जिजाबाई आहेर, शोभा अहेर, भाऊसाहेब पवार, दीपक निकम, नाना अहेर, खंडेराव जाधव, बाबूराव अहेर, गोकुळ अहेर, दत्तू अहेर, बाबाजी जाधव, उपेंद्र अहेर उपस्थित होते.
 

 

Web Title: Barku Ahire as the President of Tisgaon Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.