बारागाव पिंप्रीत कोरोना जनजागृती फेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 00:52 IST2021-03-24T22:34:33+5:302021-03-25T00:52:26+5:30
नायगाव - सिन्नर तालुक्यातील बारागाव पिंप्री येथे कोरोना जनजागृती फेरीद्वारे ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यात आले. यावेळी गावातील सर्व व्यावसायिकांना कोरोनाचे नियम पाळण्यासाठीचे पत्रकांचे वाटप करण्यात आले.

बारागाव पिंप्री येथे कोरोना जनजागृती फेरीत सहभागी झालेल्या सरपंच संध्या कटके, ग्रामसेवक अलका खेडकर, अंगणवाडी व आशा सेविका आदी.
नायगाव - सिन्नर तालुक्यातील बारागाव पिंप्री येथे कोरोना जनजागृती फेरीद्वारे ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यात आले. यावेळी गावातील सर्व व्यावसायिकांना कोरोनाचे नियम पाळण्यासाठीचे पत्रकांचे वाटप करण्यात आले.
नाशिक जिल्ह्यामध्ये कोरोना आजाराचा मोठ्या प्रमाणात फैलाव होत असून बारागाव पिंपरी गावातील प्रत्येक नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, याकरता या जनजागृती फेरीद्वारे प्रबोधन करण्यात आले. यावेळी गावांमध्ये आरोग्य विभाग व ग्रामपंचायत काढण्यात आलेल्या जनजागृती फेरीत सरपंच संध्या कटके, ग्रामसेवक अलका खेडकर, पोलीस पाटील सुरेश जाधव, आरोग्य अधिकारी, सेविका डॉ.अश्विनी अदिक, स्वाती कदम, सुधीर खालकर, हसीना शेख, चित्रा गीत, सीमा शिंदे, शोभा राजगुरू,वैशाली उगले, सुनीता राजगुरू आदी उपस्थित होते.
प्रत्येक नागरिकांनी मास्कचा वापर करावा, सुरक्षित अंतर ठेवावे, हात स्वच्छ धुवावे व नेहमी आपले घर व परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन करण्यात आले. शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे ग्रामस्थांनी सुरक्षित अंतर पाळण्या बरोबरच सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते दत्ता गोसावी यांनी केले.