शहरं
Join us  
Trending Stories
1
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
2
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
3
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
4
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
5
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
6
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
7
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
8
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
9
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
10
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
11
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
12
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
13
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
14
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
15
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
16
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
17
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
18
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
19
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
20
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले

लाख रुपयांहून अधिक व्यवहारांवर बॅँकांचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 00:26 IST

नाशिक : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्याने निवडणूक आयोगाने निवडणुका पारदर्शी व निर्भीड वातावरणात पार पडाव्यात त्यासाठी उमेदवार वा ...

ठळक मुद्देलीड बॅँकेच्या सर्वांना सूचना : बॅँकांनाही आचारसंहिता

नाशिक : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्याने निवडणूक आयोगाने निवडणुका पारदर्शी व निर्भीड वातावरणात पार पडाव्यात त्यासाठी उमेदवार वा त्यांच्या राजकीय पक्षांकडून मतदारांना पैशांचे व वस्तुंच्या स्वरूपात भेट देण्याचे प्रकार घडण्याची शक्यता असल्याने अशावेळी निवडणुकीच्या काळात पैशांचा वापर टाळण्यासाठी बॅँकांना सजग राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. एवढेच नव्हे तर बॅँकांनी आपल्या दैनंदिन व्यवहाराची नोंद ठेवतानाच, पैशांचे वहनावर काळजी घेऊन एक लाखापेक्षा अधिक रकमेचा व्यवहार करणाऱ्या खातेदाराची स्वतंत्र माहिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत.सर्व बॅँकाचे प्रतिनिधित्व करणारी महाराष्टÑ सहकारी बॅँकेने यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व राष्टÑीयीकृत व सहकारी बॅँकांना याबाबत लेखी सूचना दिल्या असून, त्यात नाशिक जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली असून, ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडून त्याचे निकाल जाहीर होईपर्यंत बॅँक अधिकाऱ्यांनी जागरूक राहण्याची गरज असल्याचे नमूद केले आहे.शिवाय बॅँकेतून नेण्यात येणाºया पैशांबाबतचे अधिकृत पत्र सक्षम अधिकाºयाचे घ्यावे तसेच सदरचे कागदपत्रे अधिकाºयाच्या सील बंद नेण्यात यावे, या पत्रांमध्ये किती रक्कम नेली जात आहे, त्यातील नोटांचे विवरणपत्र सादर करण्यात यावे, बॅँकेतून पैसे घेऊन जाताना बॅँकेने ठरवून दिलेल्या मार्गावरून वाहनाद्वारे पैसे नेण्यात यावे, निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात काळापैसा वापरला जाण्याची शक्यता असून, हा पैसा मनीलॉण्डरिंगच्या माध्यमातून बॅँकांमध्ये संशयास्पदरीत्या भरला जाईल त्याबाबत विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, असे व्यवहार होत असल्यास त्या खात्यावर व त्याची हाताळणी करणाºया व्यक्तीची माहिती गोळा करावी व त्याबाबत तत्काळ तशी सूचना वरिष्ठांना देण्यात यावी, अ‍ॅण्टी मनीलॉण्डरिंग अलर्टचा बॅँकेने गंभीरपणे विश्लेषण करावे, अशी सूचना करून प्रत्येक उमेदवाराला निवडणुकीसाठी स्वतंत्र खाते उघडण्याची सक्ती आहे.अशा वेळी या खात्याचे केवायसी करावे त्याचबरोबर बॅँकेत एक लाख रुपयांपैक्षा अधिक रकमेचा भरणा करणारे अथवा एका खात्यातून अनेक खात्यांमध्ये एक लाखाहून अधिक रुपये आरटीजीएस, एनईएफटीद्वारे हस्तांतरण केले जातील तर अशा व्यवहारांवरही लक्ष ठेवून त्याची स्वतंत्र नोंद ठेवण्यात यावी, असेही लीड बॅँकेने म्हटले आहे.नोंद ठेवणे बंधनकारकप्रामुख्याने बॅँकेच्या दैनंदिन व्यवहारानंतर जमा होणारी रक्कम प्रमुख बॅँकेत भरणा करण्यासाठी जाणाºया कर्मचाऱ्यांनी बॅँकेतील रकमेची नोंदणी करावी तसेच कोणता कर्मचारी सदरची रक्कम घेऊन कोठे जाणार आहे याची नोंद ठेवणे बंधनकारक असून, त्यासाठी अशा कर्मचाºयांकडे स्वत:चे ओळखपत्र असणे अनिवार्य आहे.

टॅग्स :NashikनाशिकBanking Sectorबँकिंग क्षेत्रElectionनिवडणूक