शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीत दिवाळे निघाले, आता कर्ज कसे फेडायचे? द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 01:48 IST

नाशिक : संपूर्ण कुटुंबाने जिवाचे रान करून पोटच्या पोरासारख्या जगविलेल्या बागेत निर्यातीसाठी योग्य ठरेल, अशी उच्चप्रतीची द्राक्षे तयार झालेली होती. त्याची निर्यात करून कर्जफेडीसह हातात आगामी वर्षासाठी खेळते भांडवल राहील असे स्वप्न पाहत असताना परतीचा पाऊस काळ बनून आला आणि सर्व होत्याचे नव्हते करून गेला.

संजय वाघ नाशिक : संपूर्ण कुटुंबाने जिवाचे रान करून पोटच्या पोरासारख्या जगविलेल्या बागेत निर्यातीसाठी योग्य ठरेल, अशी उच्चप्रतीची द्राक्षे तयार झालेली होती. त्याची निर्यात करून कर्जफेडीसह हातात आगामी वर्षासाठी खेळते भांडवल राहील असे स्वप्न पाहत असताना परतीचा पाऊस काळ बनून आला आणि सर्व होत्याचे नव्हते करून गेला. आता सरकारने अधिक अंत न पाहता एकरी एक लाख रुपये भरपाई दिल्यास पुढच्या वर्षाची तयारी तरी करता येईल, अशी आपबिती बागलाण तालुक्यामधील पिंगळवाडे शिवारातील द्राक्ष उत्पादक शेतकरी रवींद्र भामरे कथन करीत होते.पिंगळवाडे शिवारात भामरे यांची पावणेचार एकर द्राक्षांची बाग आज मरणासन्न अवस्थेत उभी आहे. बागेतून कुजका वास येत होता. एकरी दोन ते सव्वादोन लाख रुपये खर्च याप्रमाणे साधारणपणे आठ लाख खर्च करून भामरे यांनी बाग जगविली होती. ऐन दिवाळीत आलेल्या परतीच्या पावसाने दिवाळे काढले आणि बागेसाठी पाहिलेले स्वप्न अंधकारमय झाले. वडिलांनी घेतलेले कर्ज माथ्यावर थकीत असताना जिल्हा बॅँकेकडून घेतलेले साडेचार लाख तसेच खासगी सावकारांकडून घेतलेले दोन ते तीन लाख रुपयांचे कर्ज आता कोणाच्या भरवशावर फेडायचे, असा भामरे यांनी केलेला उद्विग्न सवाल अस्वस्थ करून गेला.

टॅग्स :Farmerशेतकरी