छोट्या कर्जदारांबाबत बॅँकेने सबुरीने घ्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 00:16 IST2019-05-09T00:16:22+5:302019-05-09T00:16:35+5:30
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या एकूण कर्जदारांपैकी अवघ्या पाच टक्के बड्या कर्जदारांकडे ७० ते ८० टक्के थकबाकी आहे. त्यामुळे बॅँकेच्या व्यवस्थापनाने बड्या कर्जदारांच्या मालमत्ता जप्त करून लिलाव करण्याच्या कार्यवाहीला विरोध असण्याचे कारण नाही, मात्र बड्या कर्जदारांप्रमाणे सरसकट सर्वच छोट्या कर्जदारांनाही वेठीस धरणे योग्य होणार नाही, असे मत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी व्यक्त केले व छोट्या कर्जदारांबाबत जिल्हा बॅँकेने सबुरीचे घ्यावे, अशी आपण सूचना केल्याचे ते म्हणाले.

पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकारी मांढरे यांनी जिल्हा बॅँकेच्या आर्थिक परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. बॅँकेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे थकबाकीदारांकडील वसुलीशिवाय पर्याय नाही, कर्ज वसूल झाले तरच ते ठेवीदारांना पैसे देऊ शकतील ही वस्तुस्थिती असल्याचे सांगून मांढरे यांनी, बॅँकेकडून सुरू असलेल्या सक्तीच्या वसुलीबाबत जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी आल्या असून, काही संघटनांनी निवेदने देऊन आंदोलनाचा इशाराही दिला आहे. त्यामुळे एकीकडे बॅँक वाचविणेही गरजेचे आहे तर दुसरीकडे दुष्काळी परिस्थितीत शेतकरी टिकविणेही तितकेच महत्त्वाचे असल्याने आपण बॅँकेच्या व्यवस्थापनाला यापूर्वीच टॉप टेन थकबाकीदारांवर कारवाई करण्याबाबत सूचना केल्या असून, शंभर लहान शेतकऱ्यांकडून कर्ज वसूल करण्याऐवजी एकच मोठ्या थकबाकीदाराकडून मोठी रक्कम वसूल करण्याला प्राधान्य देण्यात यावे असे मत व्यक्त केले. याकामी प्रशासन म्हणून जी काही मदत लागेल ती करण्यास तयार असल्याचे ते म्हणाले.जिल्हा बॅँकेत शेतकरीच कर्जदार व शेतकरीच ठेवीदार आहे. त्यामुळे कर्जाची वसुली न झाल्यास त्याचा परिणाम ठेवीदार शेतकऱ्यांवरच होणार आहे. हे खरे असले तरी, ज्या मोठ्या थकबाकीदारांकडे रक्कम आहे, त्यांच्याकडून ती वसूल व्हावी, परंतु लहान शेतकºयांना वेठीस धरू नये, असे आवाहनही जिल्हाधिकाºयांनी केले आहे.