बँक आॅफ बडोदामध्ये चोरी

By Admin | Updated: April 20, 2017 00:35 IST2017-04-20T00:35:00+5:302017-04-20T00:35:12+5:30

नाशिक : महात्मा गांधी रोडवरील बँक आॅफ बडोदाच्या खिडकीचे प्लायवूड कापून चोरट्यांनी कॉम्प्युटरचे मॉनिटर चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि़१८) मध्यरात्रीच्या सुमारास घडली़

Bank of Baroda stolen | बँक आॅफ बडोदामध्ये चोरी

बँक आॅफ बडोदामध्ये चोरी

 नाशिक : महात्मा गांधी रोडवरील बँक आॅफ बडोदाच्या खिडकीचे प्लायवूड कापून चोरट्यांनी कॉम्प्युटरचे मॉनिटर चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि़१८) मध्यरात्रीच्या सुमारास घडली़ शहरातील मध्यवस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे बँकेच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत शंका व्यक्त केली जाते आहे़ दरम्यान, चोरट्यांच्या हाती बँकेची रक्कम वा किमती वस्तू न लागल्याने समाधान व्यक्त केले जात आहे़
बँकेचे व्यवस्थापक विवेक विशाल (४१, रा़ संभाजीनगर, उंटवाडी, नाशिक) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार रात्री दीड ते तीन वाजेच्या सुमारास चोरट्यांनी बँक आॅफ बडोदाच्या एम़ जी़ रोड शाखेच्या खिडकीबाहेरील प्लायवूड कापून त्यातील लोखंडी जाळी वाकवून खड्डा केला़ यानंतर खड्ड्याद्वारे बँकेत प्रवेश करून ४०० रुपये किमतीचे विप्रो कंपनीचे कॉम्प्युटरचे मॉनिटर चोरून नेले़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Bank of Baroda stolen