मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ लासलगाव परिसरात बंद, उस्फुर्त प्रतिसाद
By प्रसाद गो.जोशी | Updated: October 31, 2023 11:45 IST2023-10-31T11:44:40+5:302023-10-31T11:45:48+5:30
लासलगावसह ४६ गावात बंद पाळला जात आहे.

मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ लासलगाव परिसरात बंद, उस्फुर्त प्रतिसाद
लासलगाव (शेखर देसाई): सकल मराठा समाजाच्या आवाहनानुसार उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आणि मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी लासलगावसह ४६ गावात बंद पाळला जात आहे. मंगळवारी नेहमी गजबजलेला लासलगाव येथील कांदा व्यापार आणि दुकाने बंद राहिली. बंदला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.
लासलगाव व निफाड पूर्व 46 गाव आणि सर्व विंचूर, लासलगाव बाजार समितीसह सर्व व्यापार आणि बाजार बंद सर्व गावे बंद आहेत. काल रात्री लासलगाव पुणे बसची काच फोडल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा लक्षात घेऊन सर्व बसेसच्या फेऱ्या करण्यात आल्या बंदमुळे सकाळपासून बससेवा बंद ठेवण्यात आल्याचे आगार प्रमुख सविता हनुमंत काळे यांनी सांगितले.