राष्ट्रीय महामार्गावर अखेर सुरू झाली मलमपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 18:59 IST2019-09-18T18:57:19+5:302019-09-18T18:59:16+5:30

पेठ : गुजरात राज्याला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्यांमुळे वाहनधारकांची निर्माण होणारी समस्या लोकमत मधून प्रसिद्ध होताच संबंधित ठेकेदाराने खड्यांवर मलमपट्टी सुरू झाली असून ही दुरु स्ती अत्यंत तात्पुरत्या स्वरूपाची करण्यात येत असल्याने वाहनधारकांनी नाराजी व्यक्त केली आहे

The bandage has finally started on the national highway | राष्ट्रीय महामार्गावर अखेर सुरू झाली मलमपट्टी

नाशिक ते पेठ रस्त्यावर खड्यांची डागडुजी करतांना मजूर.

ठळक मुद्देवाहनधारकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

प्रभाव लोकमतचा .....
पेठ : गुजरात राज्याला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्यांमुळे वाहनधारकांची निर्माण होणारी समस्या लोकमत मधून प्रसिद्ध होताच संबंधित ठेकेदाराने खड्यांवर मलमपट्टी सुरू झाली असून ही दुरु स्ती अत्यंत तात्पुरत्या स्वरूपाची करण्यात येत असल्याने वाहनधारकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्ग ८४८ चे सुरु असलेले नुतनीकरणाचे काम अतिशय धिम्या गतीने सुरू असल्याने पावसात मोठया प्रमाणावर खड्डे पडले आहेत. मात्र संबधित ठेकेदाराने डांबरी रस्त्यावर मोठमोठे दगड व मुरूम टाकून तात्पुरती मलमपट्टी करण्याचा केवीलवाणा प्रयत्न केला जात असला तरी या मलमपट्टीमुळे असून अडचण नसून खोळंबा अशी गत झाली आहे.
 

Web Title: The bandage has finally started on the national highway