शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

मुलांच्या पोषण आहारात केळीला आक्षेप ; पांढºया पेशींवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 12:08 AM

महापालिकेच्या ४१७ अंगणवाड्यांमधील मुले-मुलींना देण्यात येणाºया पोषण आहारात कृत्रिमपणे पिकविण्यात येणारी केळी देण्यात येऊ नये. केळीमुळे पांढºया पेशी कमी होत असल्याने आहारात त्याऐवजी दुसरे फळ देण्याची मागणी महापालिकेच्या महासभेत सदस्यांनी केली. दरम्यान, त्या-त्या प्रभागांतील बचतगटांना पोषण आहाराचे कंत्राट देण्याची सूचनाही सदस्यांनी केली.

ठळक मुद्देकृत्रिमपणे पिकविण्यात येणारी केळी देण्यात येऊ नयेबचतगटांना पोषण आहाराचे कंत्राट देण्याची सूचनानगरसेवकांना विश्वासात घेऊन बचतगटांना काम

नाशिक : महापालिकेच्या ४१७ अंगणवाड्यांमधील मुले-मुलींना देण्यात येणाºया पोषण आहारात कृत्रिमपणे पिकविण्यात येणारी केळी देण्यात येऊ नये. केळीमुळे पांढºया पेशी कमी होत असल्याने आहारात त्याऐवजी दुसरे फळ देण्याची मागणी महापालिकेच्या महासभेत सदस्यांनी केली. दरम्यान, त्या-त्या प्रभागांतील बचतगटांना पोषण आहाराचे कंत्राट देण्याची सूचनाही सदस्यांनी केली. त्यानुसार, कार्यवाही करण्याचे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले.  मंगळवारी (दि.२१) झालेल्या महापालिकेच्या महासभेत अंगणवाडीतील बालकांना पूरक पोषण आहार पुरवठा करण्यासाठी महिला बचत गटांची नेमणूक करणे व त्यासाठी येणाºया एक कोटी ६१ लाखांच्या खर्चास मंजुरी देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. यावेळी राष्टÑवादीच्या नगरसेवक सुषमा पगारे यांनी सदर ठेका देण्यास लागलेल्या विलंबाबाबत प्रश्न उपस्थित केला. मात्र, उपआयुक्त रोहिदास दोरकूळकर यांनी यापूर्वीच्या ३२ बचतगटांमार्फत आहार पुरवठ्याचे काम सुरू असून, सप्टेंबरपासून प्रक्रिया सुरू असल्याचे स्पष्टीकरण दिले. त्यानंतर सुषमा पगारे यांनी मुलांना पोषण आहारात देण्यात येणाºया केळीला आक्षेप घेतला. रसायने वापरून केळी पिकविली जात असल्याने ती बालकांच्या आरोग्याला धोकादायक असल्याचे त्यांनी सांगितले. त्याऐवजी दुसरे फळ देण्याची सूचना पगारे यांनी केली, तर राष्टÑवादीचे गटनेता गजानन शेलार यांनीही केळी देण्यास विरोध केला आणि त्या-त्या प्रभागातील नगरसेवकांना विश्वासात घेऊन तेथीलच बचतगटांना पोषण आहार पुरविण्याचे काम देण्याची सूचना केली. सभागृहनेता दिनकर पाटील यांनीही त्याचे समर्थन करत त्यानुसार कार्यवाहीची सूचना केली. दरम्यान, रमेश धोंगडे यांनी मुलांना देण्यात येणाºया खिचडीचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप केला. मूल्यांकनानंतरच वाहनांचा लिलाव महापालिकेच्या मालकीच्या जुन्या वाहनांचा लिलाव करण्यासंबंधीचा प्रस्ताव महासभेत मांडण्यात आला होता. परंतु, सेनेचे रमेश धोंगडे यांनी महापौरांच्या वाहनांची किंमत अवघी ३० हजार रुपये लावण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आणि महापौरांच्या वाहनांचा सन्मान राखा, असे सुनावले. आरटीओकडून मूल्यांकन करून घेतल्याशिवाय, सदर वाहनांची लिलाव प्रक्रिया राबविण्यात येऊ नये, असे आदेश नंतर महापौर रंजना भानसी यांनी दिले. दरम्यान, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी सुस्थितीतील जुन्या घंटागाड्यांचा वापर करण्याची सूचना केली.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSchoolशाळा