बोराळे गावची केळी थेट परदेशात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 22:03 IST2019-06-18T22:02:35+5:302019-06-18T22:03:42+5:30
साकोरा : नांदगाव तालुक्यात गेल्या दोन तीन वर्षांपासून कोरडवाहू शेतीसाठी दुष्काळी परिस्थिती असतांना, केवळ गिरणा डॅम धरणाच्या भरवशावर बागायती शेती करणारे गिरणा डॅम खोऱ्यातील आमोदे- बोराळे परिसरातील अनेक शेतकरी दरवर्षी नवीन पिके घेत उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्नात असतात. असाच एक नवीन प्रयोग बोराळे येथील शेतकरी भिलासाहेब दगा सोळुंके यांनी केळीची लागवड यशस्वी केली असून, पहिलीच कटाई करत हा माल भारताबाहेर इराण येथे एक्सपोर्ट करत इतर शेतकऱ्यांच्या पुढे एक नवीन आदर्श ठेवला आहे.

नाशिक आणि जळगाव जिल्ह्याच्या बॉर्डरवर गिरणा डॅम धरणाच्या पाण्याच्या भरवशावर वसलेले हे एक बोराळे छोटेसे गाव या गावातील उदरनिर्वाहाचे साधन म्हणून शेती हा प्रमुख व्यवसाय मानला जातो. नेहमी वेगवेगळे प्रयोग करत शेती करणारे भिला दगा सोळुंके हे त्याच्याकडे असणाºया चाळीस एकर क्षेत्रात केळी, ऊस, कपाशी, कांदा अशी पिके त्यांचे दोनभाऊ दादाभाऊ सोळुंके, साहेबराव सोळुंके, भाचा सुवर्णसिंग जाधव व पुतण्या नितेंद्र सोळुंके यांच्या मदतीने हा व्यवसाय करतात. शिक्षक झालेले असले तरी शेती कामात याची बरीच मोठी मदत यांना मिळत असते. त्यांचा लहान पुतण्या बलरामिसंग सोळुंके हा बी एस्सी. अॅग्री करून नंतर ए बी एम करून त्याला विदेशी मार्केटचा अभ्यास करण्यासाठी मागील चार वर्षात आफ्रिका, दुबई, थायलंड, इराण, इराक, सौदी अरेबिया, कुवेत आदी देशात पाठवून अभ्यास करून घेत मग स्वत:ची शेती आदर्श करण्यास त्यास मदत केली.
बोराळे शिवारातील गट नंबर २८४ नंबर मधील नऊ एकर क्षेत्रात त्यांनी २५ जून २०१८ रोजी जैन कंपनीच्या केळी पिकाची लागवड केली होती. योग्य खत, पाण्याचे नियोजन केल्याने पीक पूर्णपणे तयार झाले आणि वर्षभरात स्वत:च्या शेतात लागवड केलेली केळीची पहलीच कटाई आपला पुतण्या बलरामिसंग सोळुंके याने सुरू केलेल्या एक्सपोर्ट व्यवसायामुळे हा माल आता इराणला जाण्याचे त्यांचे स्वप्न साकार झाले आहे.
आमचा मुख्य व्यवसाय शेती असून या आधी कांदा, कपाशी आदी पिके घेतली आहेत. मात्र त्या पिकांना योग्य बाजारभाव न मिळाल्याने आता केळी पिकाची लागवड केली. केळीची पहिलीच कटाई इराणला एक्सपोर्ट करण्याचा निर्णय पुतण्या बलरामिसंग याने घेतल्याने मी त्यास होकार दिलाय माझा शेतीमाला थेट परदेशवारीला जात असल्याचे समाधान आहे.
भिलासाहेब सोळूंके
- शेतकरी, आमोदे ता. नांदगाव.