कोव्हीड मुळे यावर्षी नवरात्रोत्सवा वर बंदीचे सावट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 03:11 PM2020-10-10T15:11:52+5:302020-10-10T15:12:40+5:30

त्र्यंबकेश्वर : सध्या कोव्हीडचा कहर काहीसा कमी झाला असला तरी नवरात्र उत्सवातील दांडीया गरबा प्रेमींच्या उत्साहावर यावर्षी विरजण पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सप्तशृंगी गडावर यावर्षी शारदीय नवरात्र उत्सवावर बंदी घालण्यात आली आहे. आता हा प्रश्न केवळ कळवण तालुक्या पुरता आहे की जिल्ह्यात शारदीय नवरात्र उत्सवांवर देखील लागु आहे. हे कळण्यास मार्ग नाही. कारण या संदर्भात त्र्यंबकेश्वरचे तहसिलदार दीपक गिरासे म्हणाले अद्याप तरी माङयाकडे नवरात्र उत्सव बंदीचे आदेश आलेले नाहीत. सोमवारी एखादे वेळेस आदेश मिळण्याची शक्यता आहे.

Ban on Navratri due to Kovid this year! | कोव्हीड मुळे यावर्षी नवरात्रोत्सवा वर बंदीचे सावट !

कोव्हीड मुळे यावर्षी नवरात्रोत्सवा वर बंदीचे सावट !

Next
ठळक मुद्देयेत्या शनीवार पासुन शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ

त्र्यंबकेश्वर : सध्या कोव्हीडचा कहर काहीसा कमी झाला असला तरी नवरात्र उत्सवातील दांडीया गरबा प्रेमींच्या उत्साहावर यावर्षी विरजण पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सप्तशृंगी गडावर यावर्षी शारदीय नवरात्र उत्सवावर बंदी घालण्यात आली आहे. आता हा प्रश्न केवळ कळवण तालुक्या पुरता आहे की जिल्ह्यात शारदीय नवरात्र उत्सवांवर देखील लागु आहे. हे कळण्यास मार्ग नाही. कारण या संदर्भात त्र्यंबकेश्वरचे तहसिलदार दीपक गिरासे म्हणाले अद्याप तरी माङयाकडे नवरात्र उत्सव बंदीचे आदेश आलेले नाहीत. सोमवारी एखादे वेळेस आदेश मिळण्याची शक्यता आहे.
असे असले तरी यावर्षी सार्वजनिक शारदीय नवरात्र उत्सवावर होणा-या गर्दीमुळे कोव्हीडचा संसर्ग होउ शकतो या पाशर््वभूमीवर बंदीची शक्यता गृहीत धरु न घरगुती नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी घरोघरी घट स्थापन करण्याची जय्यत तयारी सुरु आहे. घट बसविण्यासाठी लागणारे मडके
ज्याचा घटस्थापना करण्यासाठी उपयोग होतो. कुंभारवाड्यात घट स्थापने साठी लागणारे रंगीबेरंगी घट व इतर साहित्य तयार करण्याचे काम युध्द पातळीवर सौ.काळे विहणी व त्यांच्या नाती करत आहेत.
तर बांबुपासुन तयार करण्यात येणारी परडी फुलोरा घट ठेवण्या साठी लागणारे बसणे रंगवगैरे मारु नतयार करण्यात आले असल्याची माहिती रमेश काळे व सौ.काळे यांनी दिली. नवरात्रो त्सवाला सार्वजनिक स्वरु प नसले तरी घरगुती घट स्थापना सण साजरा करण्यास उत्साहाचे वातावरण आहे. तसेच गावातील नउ दुर्गा (देवीची मंदिरे) दर्शनासाठी सोशल डिस्टिन्संगचा वापर करु न लोक दर्शनासाठी जाणारच आहेत. त्यात महिला वर्गाचा लक्षणीय सहभाग राहणार आहे.

यावर्षी सलग दोन दिवस देवाची पालखी निघणार !
यावर्षी नवव्या माळेलाच म्हणजे रविवारी (दि.२५) विजया दशमी असल्याने महामृत्युंजय भगवान त्र्यंबक राजाची पालखी सीमोलंघनासाठी असलेल्या देवाच्याच जागेत (ही जागा धारणे कुटुंबियांनी देवाला दान केली आहे पालखी सीमोलंघनासाठी येत असते. त्यावेळेस परतीच्या मार्गावर ग्रामदेवता महादेवीस सोने (आपट्याची पाने) साडी चोळी देउन पालखी मंदिरात येत असते. तर लगेच दुस-या दिवशी परंपरेप्रमाणे पालखी कुशावर्त तिर्थावर जाईल. तेथुन स्नान पुजा आरती होउन पालखी परत मंदिरात आणण्यात येते. अर्थात सोशल डिस्टिन्संगचा वापर करु न पालखी काढली जाते.

Web Title: Ban on Navratri due to Kovid this year!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.