शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बाम सर हे खेळाडूंचे एक विश्वच : अंजली भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 20:53 IST

निमित्त होते, भीष्मराज बाम यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त शंकराचार्य सभागृहात बाम परिवाराच्या वतीने आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे. शनिवारी (दि.१२) संध्याकाळी झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी भागवत या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या.

ठळक मुद्देआम्हा महिला नेमबाजपटूंना ‘चिमण्या’ म्हणून लाडाने बोलवत असे. त्यांच्यासोबतचा सहवास माझ्यासाठी सुवर्णपदकापेक्षा कमी नाही

नाशिक : खेळाडूंना मानसिक आधारासोबत सकारात्मक दृष्टिकोनाची शिकवण राज्याचे दिवंगत माजी पोलीस महासंचालक व क्रिडा मानसोपचार तज्ज्ञ गुरूतुल्य भीष्मराज बाम यांनी दिली. बाम सर हे खेळाडूंचे एक विश्वच होते, असे मत अर्जुन पुरस्कार विजेता आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू अंजली भागवत हिने व्यक्त केले.निमित्त होते, भीष्मराज बाम यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त शंकराचार्य सभागृहात बाम परिवाराच्या वतीने आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे. शनिवारी (दि.१२) संध्याकाळी झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी भागवत या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. यावेळी व्यासपिठावर चाणक्य मंडळाचे अविनाश धर्माधिकारी, संजीव लाटकर, अशोक कोठावळे, अभिजित बाम उपस्थित होते. यावेळी भागवत यांनी बाम यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले, बाम सर हे नेहमी आम्हा महिला नेमबाजपटूंना ‘चिमण्या’ म्हणून लाडाने बोलवत असे. त्यांनी आंतरमनाविरुध्द कृती करण्याचे धाडस माझ्यामध्ये निर्माण केले.आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळेल आणि त्या संधीचे सोने क रता येईल, हे स्वप्नातही वाटले नव्हते; मात्र बाम सरांचे मार्गदर्शन आणि त्यांच्या ‘टिप्स’मुळे हे शक्य झाले. त्यांच्यासोबतचा सहवास माझ्यासाठी सुवर्णपदकापेक्षा कमी नाही. एकाग्रता, आत्मविश्वास कसा टिकवून ठेवायचा हे सरांकडून शिकायला मिळाले. गुरूवर्य बाम सरांचा आवाज आमचा विश्वास होता. गुरू म्हणजे विश्वास असतो आणि त्यांच्या ‘टिप्स’वर विश्वास दाखविला की मग जगही जिंकता येते, यावर माझा ठाम विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते बाम सरांच्या मना सज्जना व मनोपासना या दोन पुस्तकांसह स्मरणिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. धर्माधिकारी यांनीही मनोगतातून बाम यांच्याविषयीच्या आठवणी सांगितल्या. प्रास्ताविक डॉ. भरत केळकर यांनी केले व सुत्रसंचालन लेखक वंदना अत्रे यांनी केले.

टॅग्स :Sportsक्रीडाShootingगोळीबारAnjali Bhagwatअंजली भागवतNashikनाशिक