मालेगावी केबीएच विद्यालयात बालकवी स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 17:56 IST2018-09-15T17:56:40+5:302018-09-15T17:56:53+5:30
मालेगाव : येथील केबीएच विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयात बालकवी स्पर्धा घेण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून बी. के. देवरे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डी. यु. पाटील होते. उपप्राचार्य के. डी. दाभाडे यांनी रुपरेषा स्पष्ट केली.

मालेगावी केबीएच विद्यालयात बालकवी स्पर्धा
मालेगाव : येथील केबीएच विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयात बालकवी स्पर्धा घेण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून बी. के. देवरे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डी. यु. पाटील होते. उपप्राचार्य के. डी. दाभाडे यांनी रुपरेषा स्पष्ट केली. प्रास्ताविक आर. डी. शेवाळे यांनी केले. स्पर्धेत तिसरी ते बारावी पर्यंतचे बालकवींनी सहभाग नोंदविला. बी. के. देवरे यांनी मार्गदर्शन केले.
स्पर्धेत गटवार प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ विजेत्या बालकवींचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. ज्ञानवर्धीनी विद्या प्रसारक मंडळाचे पदाधिकारी नितीन शेठे, प्रिती कुलकर्णी, छाया निकम, श्रीमती सोनाली कुलकर्णी, शरद बावीस्कर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ही स्पर्धा कवी कै. आनंद जोर्वेकर, त्र्यंबक ठोंबरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ संपदा हिरे यांनी आयोजित केली होती. स्वरचित काव्य वाचन स्पधेत एकूण २७३ तर अन्यरचित वाचन स्पर्धेत ४४५ बालकवींनी सहभाग घेतला. यात बक्षीसपात्र ३० विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचलन आर. एम. धनवट यांनी केले तर आभार आर. बी. बच्छाव यांनी मानले.