शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

बळीराजाचा जोडधंदाही धोक्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2020 7:18 PM

सायखेडा : कॅलिफोर्निया तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरातील शेतकऱ्यांचा जोडधंदा म्हणून पशुव्यवसायाकडे पाहिले जाते. परंतु आता पशुखाद्याच्या दरात वाढ झाल्याने व दुधाचा भाव पशुपालकांना परवडत नसल्यामुळे शेतकऱ्यांसह पशुपालक अडचणीत आले आहेत. त्यामुळे पाळीव जनावरे विकत घेण्याकडे कल कमी होत आहे.

ठळक मुद्देगोदाकाठ परिसरातील चित्र : पशुखाद्याचे दर वाढल्याचे परिणाम

सायखेडा : कॅलिफोर्निया तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरातील शेतकऱ्यांचा जोडधंदा म्हणून पशुव्यवसायाकडे पाहिले जाते. परंतु आता पशुखाद्याच्या दरात वाढ झाल्याने व दुधाचा भाव पशुपालकांना परवडत नसल्यामुळे शेतकऱ्यांसह पशुपालक अडचणीत आले आहेत. त्यामुळे पाळीव जनावरे विकत घेण्याकडे कल कमी होत आहे.शासनाकडून दुग्ध व्यवसायाला प्राधान्य देण्यात येत आहे. अशातच जनावरांच्या खाद्यात वाढ झाल्याने पशुपालक अडचणीत सापडले आहेत. खाद्याची किमत व दुधाच्या शासकीय दरातील तफावत लक्षात घेता जनावरे कशी पाळावी, असा प्रश्न पशुपालकांसमोर उभा राहिला आहे. अशातच या खाद्याच्या भावात गेल्या अनेक वर्षांनंतर मोठी दरवाढ करण्यात आली आहे. यामुळे पशुपालक चांगलेच संकटात सापडले आहेत.आज सद्यस्थितीत सरकी ३० रुपये किलो, ढेप ३८ रुपये किलो, सुग्रास २३ रुपये किलो, गोळीपेंड २२ रुपये किलो, तर शेंगपेंड ४५ ते ५० रुपये किलो झाली आहे. त्याप्रमाणात शासकीय दुधाचा भाव २२ रुपये लिटर आहे. खाद्य व दुधाचे दर यांच्यातील तुलना केल्यास जनावरे न पाळलेली बरी, असे शेतकरी म्हणू लागले आहे. वर्तमानकाळात दुभती जनावरे पाळण्याच्या संख्येत बरीच घट झाली आहे.एकीकडे संपूर्ण निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरात गवत, गंजी आणि कडब्याची नेहमीच कमतरता असते, तर दुसरीकडे दिवसेंदिवस खाद्याच्या वाढत्या दरामुळे ही परिस्थिती ओढावल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे.चौकट...शासनाकडून शेतीपूरक व्यवसायाला दुग्ध व्यवसायाची जोड द्यावी असे सल्ले वारंवार दिले जात असून, अनुदानावर जनावरे दिली जात आहेत. अशातच आता जनावरांच्या खाद्यात विक्रमी वाढ केल्याने पशुपालकांनी अनुदानावर देण्यात येणारे ते जनावरे घेण्याकडे पाठ फिरविली आहे. शासनाने दुधाच्या शासकीय दरात वाढ करावी किंवा जनावरांच्या खाद्यांचे दर कमी करावे, अन्यथा येत्या काळात जनावरे पाळणाऱ्यांचे प्रमाण आणखी कमी होण्याची भीती नाकारता येत नाही.- गणेश मोगल, संचालक, दूध डेअरी, भेंडाळी

टॅग्स :Farmerशेतकरीmilkदूध