शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
2
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
3
ट्रम्प यांच्या टॅरिफवर आज कोणताही निर्णय नाही, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी दुसऱ्यांदा पुढे ढकलली
4
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
5
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
6
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
7
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
8
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
9
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
10
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
11
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
12
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
13
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
14
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
15
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
16
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
17
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
18
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
19
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
20
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
Daily Top 2Weekly Top 5

संकटांचा सामना करत श्रमाने मोती पिकवण्याची बळीराजाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 14:58 IST

येवला : तालुक्यातील पेरणी झालेल्या पिकाची उगवण व पिक परिस्थिती सध्यातरी समाधानकारक आहे. मात्र, यंदाही मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा तर कापूस पिकावर सेंद्रीय बोंड अळीचा प्रार्दुभाव दिसून येत आहे. नेहमीपेक्षा यंदा सोयाबीनचे क्षेत्र वाढले असले तरी उगवण क्षमतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देयंदा सोयाबीनचे क्षेत्र वाढले असले तरी उगवण क्षमतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

योगेंद्र वाघ । लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : तालुक्यातील पेरणी झालेल्या पिकाची उगवण व पिक परिस्थिती सध्यातरी समाधानकारक आहे. मात्र, यंदाही मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा तर कापूस पिकावर सेंद्रीय बोंड अळीचा प्रार्दुभाव दिसून येत आहे. नेहमीपेक्षा यंदा सोयाबीनचे क्षेत्र वाढले असले तरी उगवण क्षमतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.विषम पाणी पुरवठ्याने तीन भागात विभागलेला दुष्काळी तालुका म्हणून येवल्याची ओळख आजही कायम आहे. कालवा लाभक्षेत्रातील शेती वगळता तालुक्यातील शेती आजही, नैसर्गिक जलस्त्रोतांवरच अवलंबून आहे. पाऊस पडला तर शेती पिकली हे या भागातील समीकरण गेल्या पन्नासवर्षातही बदलू शकले नाही. नगदी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल असल्याने तालुक्यात पारंपारीक पिकांकडून मका, कपाशी, सोयाबीन पिकांकडे शेतकरी वळले आहे. मात्र, अस्मानी, सुल्तानी संकटांनी तालुक्यातील शेतकर्?यांची पाठ सोडलेली नाही.गेल्या दोन वर्षात तालुक्यात पर्जन्यमान चांगले राहिले परिणामी उत्पादन वाढले परंतू शेतमालाचे भाव नेहमीप्रमाणेच पडल्याने तोंड मिळवणी करतांना शेतकऱ्यांना कसरतच करावी लागली. यंदाही, कोरोनाचा फटका बसल्याने शेतमालाचे भाव पडले अन् शेतकरी अिर्थक संकटात सापडला आहे. द्राक्ष, डाळींब,कांदा व भाजीपाला उत्पादकांना याचा मोठा फटका बसला. नगदी पिक हाच तालुक्याचा आजचा पिक पॅटर्न बनला असून यंदा उत्तर-पूर्व भागात चांगला पाऊस झाल्याने नद्या, बंधारे भरले तर विहिरींना पाणी उतरले आहे. या तुलनेत कालवा लाभक्षेत्रात दक्षिण-पश्चिम भागात मात्र पावसाचे प्रमाण कमी आहे. पेरण्यानंतर पावसाने ओढ दिल्याने केलेला खर्च वाया जातो की काय, या धास्तीने शेतकरी हवालदिल झाला होता. मात्र, बहुत्वांशी पिकांनी जमीनीच्यावर डोके काढल्याने बळीराजाच्या जीवात जीव आला आहे.चाचणीसाठी सोडण्यात आलेले मांजरपाड्याचे पाणी बाळापूर पर्यंत पोहचल्याने उत्तर-पूर्व भागातील वंचितांच्या आशा पालावल्या आहेत. तालुक्यातील वंचित भागातील अनेक शेतकºयांनी शेततळी करून नैसर्गिक व उपलब्ध पाण्याचा साठा करत शेती फुलवण्याचा प्रयत्न केला आहे. बोटावर मोजण्या इतक्या शेतकºयांनी शेतीतील नवे प्रयोग व नवे पिके घेण्याचा प्रयत्नही केला आहे. डोंगरपट्यातील शेतीसाठी स्वतंत्र विचार होणे ही काळाची गरज आजही कायम आहे.(फोटो २७ येवला,१)

टॅग्स :Waterपाणीagricultureशेती