मानोरी परिसरात अवकाळी पावसाने बळीराजा चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 00:20 IST2020-10-18T21:58:43+5:302020-10-19T00:20:27+5:30
मानोरी : परिसरात खरीप हंगामातील मका, सोयाबीन आदींसह पिकांच्या सोंगणीला वेग आलेला असतांना सलग दोन दिवस पावसाने अचानक हजेरी लावल्याने शेतकरी वर्गाची मोठी धावपळ झाली.

मानोरी परिसरात अवकाळी पावसाने बळीराजा चिंतेत
मानोरी : परिसरात खरीप हंगामातील मका, सोयाबीन आदींसह पिकांच्या सोंगणीला वेग आलेला असतांना सलग दोन दिवस पावसाने अचानक हजेरी लावल्याने शेतकरी वर्गाची मोठी धावपळ झाली.
शनिवारी, रात्री साडे आठ वाजेच्या दरम्यान तर रविवारी (दि. १८) दुपारी तीन वाजेच्या दरम्यान परतीच्या पावसाने अचानक हजेरी लावल्याने शेतकरी वर्गाची एकच तारांबळ उडाली. नव्याने सुरू असलेली लाल कांदा लागवड आणि मक्याचा चारा या अवकाळी पावसामुळे धोक्यात आला आहे. यंदा परतीच्या पावसाने अनेक ठिकाणी पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. गेल्या आठ- दहा दिवसांपासून परिसरात मका, सोयाबीन सोंगणी कामात शेतकरी व्यस्त असून अवकाळी पावसाच्या धास्तीने शक्य होईल तेव्हढ्या लवकर शेतमाल सुरक्षित घरी नेऊन टाकला जात आहे. चारा अद्यापही शेतातच पडून असून अवकाळी पाऊस असाच चालू राहिला तर जनावरांच्या चार्याचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे. यावर अनेक ठिकाणी पर्याय म्हणून शेतकरी शेतातच मक्याची कुट्टी करून घरी साठवत असल्याचे चित्र आहे.