संततधारेने बळीराजा समाधानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:10 IST2021-07-22T04:10:36+5:302021-07-22T04:10:36+5:30
नांदूरवैद्य : पावसाचे माहेरघर असलेल्या इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, बेलगाव कुऱ्हे, नांदगाव बुद्रुक, गोंदे दुमाला, ...

संततधारेने बळीराजा समाधानी
नांदूरवैद्य : पावसाचे माहेरघर असलेल्या इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, बेलगाव कुऱ्हे, नांदगाव बुद्रुक, गोंदे दुमाला, जानोरी आदी भागात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेने ब्रिटिशकालीन असलेल्या दारणा धरणाच्या जलसाठ्यात थोड्या प्रमाणात वाढ झाली आहे. या परिसरात मुख्य पीक असलेल्या भात लावणीच्या कामांना वेग आला आहे. इगतपुरीच्या पूर्व भागात यंदा मान्सून योग्य वेळेत दाखल झाला नसला तरी उशिराने सुरू झालेला वरूणराजा परत बरसला आहे. या परिसरात मागील चार दिवसांपासून झालेल्या पावसाने शेतात पाणी झाले आहे. शेतीला आवश्यक असणाऱ्या प्रमाणात पाऊस झाल्याने यंदा भात लावणी जुलै महिन्यात सुरू झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. संततधारेने येथील नदी, नाले, छोटे-मोठे ओंडओहोळ तसेच दारणा नदीपात्र काही प्रमाणात वाहताना दिसत आहे. तालुक्यातील धरणांच्या जलसाठ्यात वाढ होत असतानाच ब्रिटिशकालीन असलेल्या दारणा धरणाच्या जलसाठ्यातदेखील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसामुळे वाढ झाली आहे. मागील आठवड्यात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे दारणा धरणात जूनच्या अखेरीस अवघे ४५.३ टक्के जलसाठा उपलब्ध होता; परंतु दोन दिवसांपासून सुरू असलेल्या इगतपुरी, घोटी परिसरातील जोरदार पावसाने तसेच दारणा धरण परिसरात सुरू असलेल्या संततधारेमुळे दारणा धरणाच्या जलसाठ्यात वाढ होत आहे.
------------------------
मजुरांची टंचाई
दोन ते तीन दिवसांपासून चाललेल्या संततधारेमुळे परिसरातील शेतकऱ्यांची मुख्य पीक असलेल्या भात लावणीची लगबग सुरू असून, भात लावणीची कामे लवकर उरकण्यासाठी तसेच मजुरांची टंचाई या कारणामुळे जपानी भात लावणीला प्राधान्य देत आहेत. यावर्षी शेतकऱ्यांनी विहिरींच्या पाण्यावर भाताची रोपे टाकली होती. ऐन पावसाला सुरुवात झाल्याने आणि लावलेली रोपे तरारुन आल्यामुळे तसेच भात लावणीला पोषक असे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे येथील शेतकरी मजूर टंचाईमुळे ट्रॅक्टरसारख्या यंत्राचा आधार घेऊन गाळ तयार करून भात लावणीची कामे पूर्ण करत आहेत.
--------------
इगतपुरीच्या पूर्व भागात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे जपानी भात लावणी करताना येथील शेतकरी. (२१ नांदूरवैद्य १)
210721\21nsk_15_21072021_13.jpg
२१ नांदूरवैद्य १