सटाणाजवळील अपघातात दोन वृध्दांसह बालीका ठार
By Admin | Updated: April 23, 2017 15:46 IST2017-04-23T14:44:45+5:302017-04-23T15:46:08+5:30
सटाणाजवळील अरयी फाटा येथे रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या मोटारीच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन झाडावर जाऊन धडकले.

सटाणाजवळील अपघातात दोन वृध्दांसह बालीका ठार
नाशिक : सटाणा जवळील अराई फाटा येथे दुपारी पावणे एक वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातामध्ये दोन वृध्द जागीच ठार झाले तर एका बालिकेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातातील जखमींची नावे अद्याप समजू शकली नाहीत. सटाणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्विफ्ट मोटार (एमएच४१ व्ही ३७२१) ब्राम्हणगावाकडून सटाण्याकडे जात होती. दरम्यान, चाकाचे घर्षण होऊन आणि उन्हाच्या तीव्रतेमुळे पुढील टायर फूटल्याने अराई फाट्याजवळ वाहनचालकाचे नियंत्रण सुटले आणि मोटार झाडावर जाऊन आदळली. या अपघातात विजय गोविंद जाधव (६२. रा. सातमाने ) रामराव वामन आहेर (६५, रा. देवळा) गौरी गोविंद निकम (१३) यांचा मृत्यू झाला असून वाहनचालकासह काही जखमी झाले आहेत; मात्र अद्याप जखमींची नावे समजू शकली नाहीत. याबाबत सटाणा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.